अर्थविश्व

UPI : मोदींच्या डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; 13 देश स्वीकारणार UPI

भारताच्या डिजिटल पेमेंटपासून ते डिजिटलीप्रदान केलेल्या सरकारी मदतीची जगभरात चर्चा आणि प्रशंसा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

India UPI System : जागतिक अर्थव्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

भारताच्या डिजिटल पेमेंटपासून ते डिजिटली-प्रदान केलेल्या सरकारी मदतीची जगभरात चर्चा आणि प्रशंसा होत असून, जागतिक अर्थव्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

जगभारातील 13 देशांनी भारताच्या UPI (Unified Payment Interface) पेमेंट सिस्टमचा अवलंब करण्यास सहमती दर्शविली आहे, अशी माहिती दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. लवकरच UPI ची सेवा सिंगापूरमध्ये सुरू होणार आहे.

सिंगापूरने UPI सह त्याचे एकत्रीकरण पूर्ण केले आहे. भारताप्रमाणे इतर देशांतील डिजिटल इकोसिस्टमवर काही कंपन्यांची मक्तेदारी असून, फक्त भारतातच डिजिटल इकोसिस्टम सर्वांसाठी खुली असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. त्यामुळेच गुगलने आपली पेमेंट सिस्टीम सोडून यूपीआयचा अवलंब केला आहे.

सायबर सुरक्षेसह महत्त्वाच्या बाबींवर चर्चा

दरम्यान, लखनऊ येथे नुकत्याच झालेल्या DEWG बैठकीत एमएसएमईंना सायबर सुरक्षा तसेच सायबर सुरक्षा प्रशिक्षणावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. विकसनशील देशांसाठी एमएसएमई अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून, या सर्वांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण देणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT