Gofan Article sakal
Gofan Article sakal esakal
Blog | ब्लॉग

गोफण | बिहारपुरीच्या पलटू चाचांचा उधारराजेंना फोन

संतोष कानडे

बिहारपुरीत उत्साहाला पारावार उरला नव्हता.. गल्लोगल्ली सडासारवण करुन रांगोळ्या काढल्या जात होत्या, घराघरात फाफडा-जिलेबीचा घमघमाट सुटला होता. कित्येक वर्षांचा जुलूम अन् अन्यायाच्या जोखडातून बिहारपुरी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत होती. हे स्वातंत्र्य असं सहजासहजी मिळालं नव्हतं.. बिहारपुरीचे जुने जाणते लढाऊ नेते-वीरपुरुष-स्वातंत्र्याच्या सुर्यकिरणांना खेचून आणणारे.. स्वातंत्र्य सैनिक पलटू चाचा यांचा अविरत संघर्ष त्यामागे होता.

पलटू चाचांच्या घरातलं तर मांगल्य कमरेत वाकून गुलाबपाणी शिंपडत होतं. चाचांचा आजचा रुबाब जरा निराळाच होता. भगव्या रंगाचा मोदी कुर्ता, पांढरा पायजमा अन् त्यावर नक्षीदार गडद भगवं जॅकेट. जॅकेटच्या खिशातून टोकदारपणे बाहेर आलेला कापडी कोन अन् त्या कोनाला लोंबकळणारी सोन्याची साखळी, त्या साखळीला इवलुशे हिरे लगडलेले होते. गळ्यात देखील एक सोन्याचं लॉकेट चमकत होतं, त्याला असलेल्या पेंडेंटच्या कुपित दोन दिल्लीकर नेत्यांचे फोटो दडवून ठेवले होते.

आजचा दिवस खास असल्याने त्यांनी पाईंट टूची शेव्हिंग करवून घेतली होती. त्यामुळे दाढी देखील चमकत होती. केसांच्या जुन्याच वळणाला नव्याने कंगवा फिरवल्याने ते शानदारपणे आपापल्या जागी विसावले होते. वाऱ्याची झुळूक आल्यावर त्यातले दहा-बारा केस उड्या मारीत. पण त्यामुळे कुठेही बदअमल होत नव्हता. उलट पलटू चाचांचं सौदर्य उजळून निघत होतं.

सगळं कसं पद्धतशीरपणे सुरु होतं. गावात सगळ्यांसाठी गोडाच्या जेवणाचा बेत होता. आहुनाच्या हांडी मटणाला पूर्णपणे पायबंद घालण्यात आलेल्या होता. तरीही बिहारपूरच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहणारे दुसरे एक लढाऊ सेनानी लालाभाई आहुना मटणाची तयारी करीत होते. 'सोबत लढायचं सांगून तुम्ही ऐनवेळी शत्रुपक्षाला जावून मिळालात' हे दुःख लालाभाईंच्या मनात घर करुन बसलं होतं. त्यामुळेच निषेधाचा बेत म्हणून त्यांनी वशाटाची तयारी सुरु केली होती.

इकडे जिंकलेल्या गटाने पलटू चाचांच्या घरी गर्दी करुन त्यांना फुलाहार अर्पण करुन त्यांचे गोडवे गायला सुरुवात केली. बाजूलाच जिलेबी, फाफडा आणि ढोकळ्यावर ताव मारत जेवणावळी उठत होत्या. पलटू चाचांनी अजूनही तोंडात एक घास घेतलेला नव्हता. लालाभाईंच्या घरात नेमका बेत काय आहे, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे इथून थेट निघावं आणि लालाभाईंना मिठी मारावी.. हाडींवर भरपेट ताव मारावा, असं त्यांना वाटे.

पलटू चाचांच्या मनातले हे विकार एका फोनने दूर झाले. गळ्यातल्या लॉकेमध्ये दडलेल्या दोघांपैकी एका दिल्लीकर नेत्याचा त्यांना फोन आला.. चाचांच्या चेहऱ्यावरच्या शौर्याची जागा क्षणात भाबड्या हास्याने घेतली.. ''जी..जी...जी बोलीए बोलीए..'' असं म्हणतच त्यांनी फोनवर बोलायला सुरुवात केली.

तिकडून ते शीर्षस्थ नेते बोलले ''बधाई हो चाचाजी.. आपको हार्दिक शुभकामनाए.. आपने जो कदम उठाया है उसमें भारत की आझादी का गीत हैं.. और इंडिया के पारिवारिक गुलामी का अंत हैं.. '' इकडून चाचा मात्र केवळ ''जीजी..जीजी'' करत कमरेत वाकले होते. शीर्षस्थ नेते पुढे बोलले, ''आपने तो ढोकला बनाया हैं, लेकिन मुझे वडापाव खाने का मन रहा हैं'' चाचा सावरले त्यांनी नजर शुन्यात केली.

दिल्लीकर नेत्याला नेमकं काय म्हणायचं होतं, हे चाचांनी ओळखलं होतं. चाचांनी बाजूला जात लगेच एक फोन फिरवला. तो फोन मुंबापुरीत लागला होता. चाचा बोलले, ''कैसे हो उधार राजे?'' तिकडून तिकडून उधारराजे बोलले, ''हम ठीक हैं आप बोलो...'' तसे चाचा बोलते झाले, ''वो क्या हैं ना आपके पुराने और हमारे नए-पुराने दिल्ली के नेताजी ने वडापाव खाने की तमन्ना रखीं हैं..''

चाचांनी बिघाडी करुन ठेवल्याने आधीच चिडलेले उधारराजे आणखी संतापले, ''हम क्या तुमको वडापाव की गाडीवाला दिखता है क्या? तुम हमको कायको वडापाव को उनको देने को बोलता? तुम तुमारा देखलो ना...'' चाणाक्ष चाचाजी कुत्सितपणे हसले. म्हणाले, '' उधारराजे जी, हे अपना पुराना भारतही सबसे अच्छा हैं.. उस नए इंडिया में रखा ही क्या हैं... आप आएंगे तो बहार आएगी.''

''पहले हमको बाहर किया अब बहार की बात करते हैं.. पहले हमको दियेवाला शब्द फिराया अब विश्वास की बात करते हो.. पहले हमरा पक्ष छिन लिया अब साथ देणे की बात करते हो.. अब सब फट गया हैं'' उधार राजेंच्या रंगीबेरंगी हिंदीला मध्येच थांबवत पलटू चाचा बोलले, ''अरे राजाजी, पहले हमारा भी ऐसाही ओरा था.. अब हम पलट गए हैं. आप भी पलटीए मजा हैं मजा.. आप खाली वडापाव खिलाव, आपको जो मांगा वो मिलेगा...''

उधारराजे बोलले, ''तुम हमारा पक्ष दो हम तुमे वडापाव देंगे.. असा नारा चालेल काय?'' तोंडाचा चंबू करुन हिंदी लोक जे 'च' उच्चारतात तसं चाचा बोलले, ''चॉलेल..चॉलेल... का नाय चॉलेल.'' तसं उधारराजे पुन्हा भानावर आले. ''तुमारा चॉलेल चॉलेल हो.. पण हमारे इधर हम लोगो का क्या तोंड देंगे. हमारा मराठी का सब अलग रहेता.. तुमको क्या-''

''वो सब सोचेंगे राजाजी.. आपण खाली हां भर दो'' उधारराजेंनी हे ऐकून जरा विचार केला. म्हणाले, ''हम हमारा मराठी का कना तुटने नहीं देंगे. लेकिन हमको सबको पुछना पडेगा.. हमारे घडीवाले काका क्या कहते हैं देखते हैं''.

असं बोलून उधारराजेंनी फोन ठेवला.. ते थेट घडीवाल्या काकांकडे निघाले. आता घडीवाले काका पुतण्याचा विचार आधी करतात की उधारराजेंना एवढाच काय तो राजकीय उलगडा व्हायचा राहिला होता..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT