Gofan Article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | या तुफानाला कुणी तिकीट देतं का? तिकीट?

एक तुफान पदावाचून, प्रसिद्धीवाचून, कार्यकर्त्यांच्या मायेवाचून, दिल्लीश्वराच्या दयेवाचून, विमानातून-हेलिकॉप्टरातून हिंडत आहे..

संतोष कानडे

(नाशिकचे नामवंत भोजपुरी कलाकार मगनराव बाहुबळे खिन्न मनाने उदासी चघळत बसले होते. आज पुन्हा एकदा त्यांना त्यांचं ते जुनं सादरीकरण आठवलं आणि त्यात नव्याने शब्द पेरण्याचा मोह झाला. तातडीने छोटेखानी मेळावा बोलावला अन् भावनांना वाट मोकळी करुन देत जवळजवळ रडूच लागले.)

कुणी तिकीट देता का रे? तिकीट?

एका तुफानाला कुणी तिकीट देता का?

एक तुफान पदावाचून,

प्रसिद्धीवाचून,

कार्यकर्त्यांच्या मायेवाचून,

दिल्लीश्वराच्या दयेवाचून,

विमानातून-हेलिकॉप्टरातून हिंडत आहे..

जिथून कुणी उठवणार नाही,

अशी खुर्ची ढुंढत आहे..

कुणी तिकीट देता का रे? तिकीट?

खरं सांगतो बाबांनो,

तुफान आणखी एकदा चमकू लागलंय,

चर्चा-बैठकात.. वार-पलटवारात

अर्ध-अधिक उजळून गेलंय..

मतांच्या लाटावरती,

विरोधकांच्या ज्वाळावरती,

झेप झुंज घेऊन घेऊन,

तुफान आता टप्प्यात आलंय...

दाढी कुरवाळत, चष्मा सावरत

तुफानाला दिल्लीत जायचंय..

खरं सांगतो बाळांनो,

तुफानाला तुफानपणच नडतंय रे,

अरे बाबा.. कुणी तिकीट देतं का रे? तिकीट?

तुफानाला महल नको,

मोठमोठाले स्टेज नको,

मान नको-सन्मान नको,

फारमोठी खाती नको,

एक हवं छोटंस तिकीट..

बाकड्यावर बसण्यासाठी,

सोबत हवी एक रेशमी मफलर

तुफानाच्या खांद्यांसाठी...

नंतर एक हवा छोटासा भोंगा

तुफानाला बोलण्यासाठी...

हं.हं.. तुफानाला आणखी एक खुर्ची हवीय,

पुतणे राजांसाठी.

तुफानाच्या वाटेत कुणीतरी काटे पेरतंय,

डावलून, हेटाळून तुफानाला डिवचतंय,

अरे बाबांनो, तुफानाला काही नको,

हवंय फक्त एकच तिकीट..

हे तुफान इच्छूक होतं, इच्छूक आहे

आणि इच्छूक राहणार...!

कुणी तिकीट देतं का रे? तिकीट?

समाप्त

Santosh Kanade

Email: santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील सदर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT