Baba Maharaj Satarkar Passed Away esakal
Blog | ब्लॉग

Baba Maharaj Satarkar : अध्यात्‍म... विज्ञान आणि दोन दिग्गज! चिटणीसांनी सांगितला 1993 मधील मराठी साहित्‍य संमेलनाचा किस्सा

सातारा येथे ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) १९९३ मध्ये झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

बाबामहाराज सातारकरांनी तर आपल्‍या रसाळ वाणीने, अभिनय कौशल्‍याने, तालासुरात पेरलेल्‍या अभंगांच्या दाखल्‍यांनी सारा प्रेक्षकवर्ग जिंकून घेतलेला.

Baba Maharaj Satarkar Passed Away : साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनात बाबामहाराज सातारकर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले (Shivajirao Bhosale) यांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी एका परिसंवादाच्या निमित्ताने जुळून आली होती. या गाजलेल्या परिसंवादाची एक आठवण...

-शिरीष चिटणीस, सातारा

सातारा येथे ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) १९९३ मध्ये झाले होते. या संमेलनातील १५ ते २० हजार नागरिकांच्या उपस्‍थितीत झालेला एक हृदयस्‍पर्शी कार्यक्रम म्‍हणजे संत साहित्‍यावरील परिसंवाद. सहभाग होता बाबामहाराज सातारकरांचा आणि विषय होता संत साहित्‍याने महाराष्‍ट्र घडविला का बुडविला?

सायंकाळी ५ ते ६.३० ही परिसंवादाची ठरलेली वेळ होती; परंतु या परिसंवादाने साहित्‍यिकांतील गहन चर्चेची उच्च पातळी गाठली. पुढील कार्यक्रम रद्द करून हा परिसंवाद रात्री नऊपर्यंत चालला. लोकांना मंत्रमुग्ध करून गेला. अध्यक्ष होते प्राचार्य राम शेवाळकर आणि सहभागी वक्‍ते होते बाबामहाराज सातारकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्रा. यशवंत पाठक, प्राचार्य द. ता. भोसले, रवींद्र भट आणि सोमनाथ कोमरपंथ.

सर्व वक्‍त्‍यांनी अभ्‍यासपूर्ण पद्धतीने परिसंवादाचा टेंपो वाढवीत नेलेला. बाबामहाराज सातारकरांनी तर आपल्‍या रसाळ वाणीने, अभिनय कौशल्‍याने, तालासुरात पेरलेल्‍या अभंगांच्या दाखल्‍यांनी सारा प्रेक्षकवर्ग जिंकून घेतलेला. त्‍यांच्या भाषणाने-मनोगताने परिसंवादाचा कळस गाठलेला. त्‍यांच्या रसाळ वाणीने एवढा मोठा जनसमुदाय मंत्रमुग्‍ध झाला. आपण साहित्‍य संमेलनात आहोत, की पंढरीच्या वाळवंटी कीर्तनात दंग आहोत, असा संभ्रम सर्वांना पडलेला.

मांडवात पाय ठेवायला जागा नाही आणि तरीही टाचणी पडली तरी शांततेचा भंग होईल एवढे प्रेक्षक त्‍यांच्याशी समरस झालेले आणि विषयाशी तादात्म्‍य पावलेले. त्‍यांनी संतांचे माहात्म्य आणि वारीचे महत्त्‍व सांगितले. जगामध्ये पंढरीची वारी हीच सर्वधर्मसमभावाची शिक्षण देणारी पहिली सुधारणेची पायरी आहे, हे सांगताना वारीचे एक हजार वर्षातील दाखले त्‍यांनी दिले.

त्‍यांच्यानंतर कोणाही वक्‍त्‍याला सभा जिंकणे अवघड होते. विरोधी विचार मांडणे तर केवळ अशक्‍य होते. टिपेला गेलेला बाबामहाराजांचा आवाज वातावरणात तरंगत असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्‍या शांत, खालच्या पट्टीतील आवाजात बोलायला सुरुवात केली आणि संतांचे माहात्म्य मान्य करूनही विज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्‍टीने संतांच्या समाजावरील प्रभावाच्या मर्यादा स्‍पष्‍ट केल्‍या. अध्यात्‍माला विज्ञानाची जोड दिल्‍याशिवाय आचारात, विचारात संतुलन येणे कसे अशक्‍य आहे, याचे विवेचन केले.

आधीच्या वक्‍त्‍यांच्या प्रतिपादनातील अपुरेपणा त्‍यांनी दाखवून दिला. त्‍यांचे भाषण तळमळीचे व विज्ञाननिष्‍ठ असे होते. बाबामहाराज सातारकर यांच्या भाषणाने भारावलेल्‍या प्रेक्षकांना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या विचारातील विवेकवादाचे आग्रह संमोहित करीत होता. भारावलेल्‍या सभेला विज्ञानाचे महत्त्व पटवून त्‍यांना त्‍यांनी विचारप्रवृत्त केले. दोघेही संपूर्ण महाराष्‍ट्राचे या परिसंवादाने हिरो ठरले. पुढील वर्षभर या परिसंवादाच्या चर्चा वेगवेगळ्या तऱ्हेने संपूर्ण महाराष्‍ट्रभर उमटत होत्‍या. आज बाबामहाराज सातारकर यांच्या जाण्याने या आठवणी पुन्हा उचंबळून आल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT