Propose Day Special Story esakal
Blog | ब्लॉग

Propose Day: काही भेटी तेव्हा जास्त सुखद वाटतात जेव्हा त्या अपूर्ण राहतात... एक राहून गेलेला प्रपोज

माघात आलेल्या अवकाळी पावसासारखा तो माझ्या आयुष्यात आला... क्षणभरासाठी धो धो बरसला आणि...

Lina Joshi

Propose Day Special Story: माघात आलेल्या अवकाळी पावसासारखा तो माझ्या आयुष्यात आला... क्षणभरासाठी धो धो बरसला आणि माझ्या कोरड्या मनाला त्या मातीसारखी ओल देऊन गेला... काही गोष्टींची मजा तेव्हा येते जेव्हा त्या अपूर्ण राहतात, म्हटलं तर आपण समाधानी नाही आहोत म्हणून दुःखी होऊ शकतो पण जर त्यातही तेवढ्या एका क्षणाला पूर्णत्व समजून जर जगलो तर त्याहून मोठं सुख कोणतच नाही. अशीच अपूर्ण असलेली पण क्षणिक ठरलेली ही कहाणी.. खरंतर ही अनोखी वेगळी अशी नाहीये, आपल्या सगळ्यांच्याच बरोबर रोज घडणारी आहे, प्रत्येका मुला मुलीसोबत घडणारी आहे.

दुपारची वेळ होती, शनिवार होता, दार शनिवार रविवार आम्ही आमच्या काकूकडे रहायला जायचो, कॉलेज संपवून मी गाडी साठी बसस्टॉप वर उभी होते. बसची वाट बघत होते... एकेक करत बस सोडत होते कारण कोणतीही बस माझ्या कामाची नव्हती... तसा आईने दिलेला डब्बा होता आणि कॅन्टीन मध्येही मी खाल्लं होतं पण तरीही जरा भूक लागली होती.

काही वेळाने एक मुलगा त्या बसस्टॉपवर आला, भारी होता... खरंतर एखादा मुलगा बघताक्षणी आवडला आहे असं घडण्याची ही पहिलीच वेळ होती. मी जरा एक दोन वेळेस नजर चोरत त्याला बघितलं... त्यानेही एकदा मला बघितलं मग मात्र मी त्याला न बघण्याचा निश्चय केला..

तसंही त्याची बस आली की तो निघून जाणार होता.. मग काय बघायचं सारखं सारखं.. परत भेट होईल का याचीही खात्री नव्हती आणि बस आली तो उभा राहिला. झालं, मानत म्हटलं बाप्पा कितीही प्रॅक्टीकल विचार केला तरी १० मिनिटं तो राहिला असता सोबत तर काही बिघडणार होतं का?

तो उभा राहिला पण नंतर परत बसला ती त्याला चालणारी बस नव्हती. मग मात्र त्याने एकेक करत ४ वेगवेगळ्या बसेस सोडल्या मग मात्र मला वाटू लागलं की यालाही आपल्याच बसने जायचं आहे. मी परत हावरटासारखं बाप्पाला म्हणाले की याला माझ्याच बसमध्ये चढू देत...

तेवढ्यात काकुचा फोन आला, मी सांगितलं की बसस्टॉपवर आहे अन् बसची वाट बघते आहे... तेवढ्यात एक बस आली, ती माझी बस होती, मी काकुशी बोलता बोलता पटकन ती बस पकडली आणि सीटवर जाऊन बसले.

काकूला म्हणाले की "मिळाली ग बस.. आलेच"

अन् मग माझ्या लक्षात आलं त्या मुलाबद्दल.. म्हटलं असो, बस सुटली होती, कोणीतरी माझ्या बाजूला येऊन बसलं. बसचे कंडक्टर काका त्यांच्या नेहमीच्या स्वरात, “बोला पुढे तिकीट” मी पास आहे म्हणाले, बाजूच्या माणसाने नेमकं माझ्याच स्टॉपच तिकीट घेतलं, उत्सुकता म्हणून मी त्याच्याकडे बघितलं.

तो तोच मुलगा होता... आई शप्पथ! बाप्पा आज जरा माझं जास्तच ऐकत होता... पुढचे ३ मिनिटं माझे याच गोष्टीच्या आनंदात गेले की तो माझ्या बाजूला बसला होता.. पण झालं ते क्षणिक होतं.. पुढे? काहीच नाही.. काय बोलणार होते मी त्याला? की तू भारी दिसतो आहेस.. असं वळण सोडून वागणं मला जमलच नसतं, घरी जाऊन मैत्रिणीला सांगितलं तर मग पुढचा महिनाभर त्याच्यावरूनच चिडवण झालं असतं.

मी शांतपणे कानात हेडफोन टाकून गाणी लावून बसले.. अन् तेवढ्यात तो बोलला..

“excuse me..”

मला दोन मिनिट कळलंच नाही.. कानातल्या  गाण्याचा आवाजच इकता तीव्र होता. तो परत म्हणाला,

“excuse me.. ऐकता का?”

मी कानातले हेडफोन काढले आणि त्याला बोलले “हा बोला ना.. sorry”

“हा स्टॉप कधी येईल माहिती आहे का? हा रूट नवीन आहे मला”

“हरकत नाही, मी त्याच स्टॉपला उतरणार आहे, सांगते” 

चला काहीतरी कारण का असेना.. त्याचा आवाज ऐकता आला.. फार पुरुषी नव्हता खरंतर त्याचा आवाज पण जरा बेस मधला होता.. मला त्याला विचारायचं होतं की हा रूट नेहमीचा नाही मग नक्की कुठला आहेस? कुठे राहतोस?.. पण परत तेच बोलण्याची हिंमत होईना.

त्यानेच परत एक प्रश्न विचारला.. “तुम्ही तिकडेच राहतात का?”

“नाही, माझे काका काकू तिकडे राहतात, शनिवार रविवार मीही तिकडे जाते.”

“ohh nice..”

“हम्म.. what about you?” मी गप्पांकडे माझा रोख वळवला..

“मी वारजेकडे राहतो. इकडे एकाला भेटायला आलो आहे फक्त.”

“ohk..”

यापुढे मात्र मला काय बोलावं हेच कळलं नाही, मी आपले मौन धरले, नी शांत बसले.

काही वेळ गेला नी स्टॉप आला, “मी म्हटलं चल, स्टॉप आला..”

“एवढ्यात?”

“हम्म.. लवकरच आला..”

“म्हणजे?”

“हं? नाही काही नाही..”

आम्ही खाली उतरलो.. मी मात्र आता आपला रस्ता धरण्याचे ठरवले. तेवढ्यात तो परत बोलला.. यावेळेस मी जरा वैतागले.. नाही म्हणता म्हणता परत परत बोलण्याचा मोह वाढववत होता तो.. मी मागे फिरले..

“thank you.. खूप मदत झाली तुमची..”

“No problem”

“Nice to meet you..” असं म्हणत त्याने shake hand साठी हात पुढे केला.. मीही shake hand केला..

तो परत बोलला.. “तुझं नाव? म्हणजे of course तू comfortable असशील तर”

मी हसले आणि म्हटले, “प्रवासात खूप माणसं भेटतात प्रत्येक व्यक्ती आपल्या ओळखीचाच हवा ह अट्टहास जरा वाईट.. Bye”

हे वाक्य त्याच्यासाठी होतं की स्वतःसाठी ते माहिती नाही, पण होतं.. ती भेट अपूर्ण होती पण सुखद होती ते ४५ मिनिटं मी जरा वेगळी होते आणि याचाच मला आनंद होता. अन् बहुदा ती अपूर्ण होती म्हणूनच सुखद होती.

~ लिना जोशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

SCROLL FOR NEXT