Astro Tips news esakal
संस्कृती

Astro Tips : आत्ता कच्च्या दुधाने करा वक्री ग्रहांना शांत

कच्च्या दुधाच्या वापराने देखील आपल्या कुंडलीतले वक्री ग्रह होतात शांत

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : आजवर ग्रहाच्या शांतीसाठी आपण होम हवन, जप, अनेक राशींचे खडे, यंत्र सोबत ठेवावे, सिध्द करावे असे अनेक उपाय बघितले असतीलच, हे उपाय अनेकदा खूप महागडेही असतात पण फक्त कच्च्या दुधाच्या वापराने देखील तुम्ही आपल्या कुंडलीतले वक्री ग्रह शांत करू शकतात.

आयुर्वेद आणि विज्ञान दोन्हीमध्ये दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय धार्मिक दृष्टीकोनातूनही दूध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि शक्यतोवर पुजेमध्ये कच्चे दूध वापरले जाते.

भगवान शंकरावर दुधाचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. दूध हा चंद्राचा कारक मानला जातो, या कारणास्तव चंद्राच्या पूजेमध्ये फक्त दूधच अर्पण केले जाते. अनेक तंत्र पद्धतींमध्येही कच्चे दूध मोठ्या प्रमाणात वापरले जाते.त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये दुधाचे असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने व्यक्ती आपल्या समस्यांपासून नक्कीच मुक्त होऊ शकते.

१. आर्थिक अडचणीसाठी

लाख प्रयत्न करूनही तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल आणि मेहनत करूनही तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर रविवारी रात्री डोक्याजवळ दुधाचा ग्लास घेऊन झोपावे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गुपचूप बाभळीच्या झाडाच्या मुळाशी दूध कुणालाही न दिसता ओतावे. हे करत असताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची खात्री करा. हा उपाय तुम्हाला 11 रविवारपर्यंत करायचा आहे.

२. ग्रह शांतीसाठी

जर तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती वक्री असेल आणि ग्रहांच्या अशुभ हालचालीमुळे तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येत असेल तर तुम्ही नियमितपणे सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण केले पाहिजे. हे तुम्हाला सलग 7 सोमवार करावे लागेल.

३. मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी

जर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल आणि तुम्हाला खूप त्रास होत असेल तर सोमवारी रात्री शिवमंदिरात जा आणि हातात कच्च्या दुधाचे भांडे घेऊन 'ॐ जूं सः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर, भगवान शिवाला दूधाचा नैवेद्य दाखवून एखाद्या गरीब व्यक्तीला द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT