Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचे भाग्य त्याच्या कुंडलीच्या आधारे ठरवले जाते. प्रत्येक व्यक्तीला जिवनात समस्या येत असतात. कुंडलीमध्ये काही असे योग येतात ज्यामळे जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. अशाच एका केमद्रुम नावाच्या योगाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मानसिक दृष्ट्या कष्ट आणि दुःख तर कधीकधी ते अनुकूल परिणाम या योगातून प्राप्त होतात. असा हा केमद्रुम योग म्हणजे काय आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.
(Astrology Kemadruma yoga in kundali impact on mental health Know the spiritual solution and significance)
राजयोगांचे शुभ प्रभाव होतात नष्ट
केमद्रुम योगाबद्दल ज्यातिष तज्ज्ञ पं. नरेंद्र धारणे सांगतात, जन्म कुंडली मध्ये चंद्र कोणत्याही भावामध्ये एकटाच असेल आणि त्याच्या पुढील किंवा मागील भावात कोणताही ग्रह नसेल तर त्यास केमद्रुम योग दोष म्हणतात. केमद्रुम योग दोष कुंडलीत असता व्यक्ती मानसिक दृष्टीने नेहेमीच कष्टी आणि दुःखी असते. यांच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव येत असतात. जन्म कुंडलीमध्ये केमद्रुम योग दोष असता कुंडलीतील अन्य राजयोग असूनसुद्धा या योगाच्या दोषामुळे त्या राजयोगांचे शुभ प्रभाव नष्ट होतात.
केमद्रुम योग दोषावर उपाय कोणते...?
यावर पं. धारणे सांगतात, केमद्रुम योग दोष निवारणासाठी व शुभ फल प्राप्तीसाठी खालील उपाय करावे.
1) सोमवारचे व्रत उपवास करावे. आठवड्याच्या दर सोमवारी शंकराला रुद्राभिषेक करावा. रुद्राभिषेक करताना या मंत्राचा जप करावा.
|| ॐ सौं सौमाय नमः ||
2) सोमवारी पांढऱ्या वस्तू (तांदूळ, दूध, पांढरी फूल, वस्त्र, कापूर, मोती, रत्न) चे दान सत्पात्र व्यक्तीस दान करावे.
3) आपल्या घरात कनकधारा यन्त्र स्थापित करून कनकधारा स्तोत्र नित्य वाचावे.
4) मोती रत्नाची चांदीत अंगठी तयार करुन ती शुक्ल पक्षातील सोमवारी धारण करावी.
5) दर पौणिमेला उपवास करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.