Budh Gochar 2023  sakal
संस्कृती

Budh Gochar 2023 : येत्या सोमवारी कुंभ राशीत होणार बुध गोचर, खास योगामुळे 'या' राशी होतील मालामाल

येत्या सोमवारी म्हणजेच 27 फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीत जाणार आहे.

निकिता जंगले

Budh Gochar 2023 : बुधला सर्व ग्रहांचा राजा म्हटले जाते. कुंडलीमध्ये बुधची स्थिति उत्तम असली तर व्यक्तिची क्षमता वाढते तर बुधची स्थिती उत्तम नसेल तर व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ उतार येत असतात. बुध देव सध्या मकर राशीत आहे मात्र येत्या सोमवारी म्हणजेच 27 फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीत जाणार आहे.

कुंभ राशीमध्ये 16 मार्चपर्यंत बुध ग्रहअसणार. त्यानंतर बुध ग्रह मीन राशीमध्ये जाणार. बुध ग्रहाचा कुंभ राशीमधील गोचर हा सायंकाळी 4 वाजता 55 मिनिटांनी सुरु होणार. सोबतच बुध ग्रह कुंभ राशीत आल्यामुळे सूर्य आणि बुधचा शुभ संयोग बनणार आहे ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होणार. चला तर जाणून घेऊया बुधच्या या गोचरमुळे कोणत्या राशींना लाभ होणार. (Budh Gochar 2023 Budh Transit 2023 will be lucky for these four zodiac signs read story)

1. वृषभ

बुधचं हे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अधिक फायदेशीर असणार. कुटूंबासोबत तुमचे नाते अधिक स्ट्रॉंग होतील. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्याला लाभ मिळणार.

व्यवसायात पार्टनिशप असणाऱ्या लोकांना याचा पुरेपुर फायदा होणार. हा गोचर त्यांच्यासाठी खूप लाभ घेऊन येणार. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळणार आणि आपली प्रतिष्ठा वाढेल, हा गोचर तुमच्या नात्यात प्रेम आणि स्नेह वाढवणार.

2. मिथुन

बुधचा हा गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. तुमची सर्व चिंता दूर करणार. कुटूंबासोबत मनमोकळा वेळ घालवाल. तुमच्या आयुष्यात सकारात्मका येईल. जवळच्या मित्र मैत्रीणींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार.

या गोचर दरम्यान तुम्हाला खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. त्यामुळे बजेटनुसार खर्च करावा लागणार. इस राशीच्या विद्यार्थ्यांना बुध गोचरचा लाभ मिळणार. विद्यार्थ्यांना पुरेपुर यश मिळेल.

3. कुंभ

बुध गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वांपेक्षा जास्त फायदेशीर असणार. या दरम्यान तुम्हाला मानसिक शांति मिळवण्यासाठी धर्म-कर्माचे करावे लागतील आणि आध्यात्मिक विषयांमध्येही तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा लागेल.

विद्यार्थ्यांसाठी हा गोचर उत्तम असणार आहे. या दरम्यान तुमची क्षमता वाढणार. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. व्यावसायिकांसाठी हा गोचर उत्तम असू शकतो. जर तुम्ही कामासंदर्भात प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम आहे.

4. मीन

बुधचं हे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार. जे विद्यार्थ्यांची विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना व्यक्तिगत जीवनात शुभफळ दिसतील.

आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. के साथ समय बिताने के लिए यह समय अच्छा साबित हो सकता है. या गोचर दरम्यान तुमची इनकम वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT