Diwali 2022 Esakal
संस्कृती

Diwali 2022 : दिवाळीत 'हे' तेल टाकून लावा दिवे ; होतील अनेक शुभ लाभ

अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

वसुबारसपासून या दिवाळीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातलं पीक कापून घरात येत असतं. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते. गणरायाला नमन केलं जातं. अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो.

पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.

दिवाळीमध्ये घरोघरी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले जातात. लक्ष्मी मातेचे स्वागत केले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का दिवे पेटवण्यासाठी तुम्ही जे तेल वापरता त्यालाही खूप महत्त्वाचे असते. दिवाळीत नेमके कोणते तेल टाकून दिवे लावावेत याची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. असं म्हणतात की, दिवाळीच्या वेळेस दिवे पेटवल्याने घरात सकारात्मक उर्जा वाढते. तसेच घरात शांतता आणि समृद्धी राहते. अशातच यावर लक्ष देणेही गरजेचे आहे की आप दिवे पेटवण्यासाठी कोणत्या प्रकारचे दिवे वापरतो. जाणून घ्या या कोणत्या 5 तेलांचा वापर दिव्यामध्ये करता येऊ शकतो. 

● गाईचे शुद्ध तूप

गाईच्या तुपाला सगळ्यात शुद्ध मानले जाते. गाईच्या तुपाने दिवे लावल्याल आजूबाजूच्या वातावरणातही सकारात्मक उर्जा निर्माण होते. असं म्हटलं जात की दिवाळीच्या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने दारिद्रय दूर होते. तसेच घरात सुख-समृद्धी राहते. यासोबतच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते. 

● तिळाच्या तेलाचा वापर

तिळाच्या तेलाचा वापर करून दिवे लावणेही शुभ मानले जाते. याचा वापर केल्याने सर्व दोष समाप्त होतात. तसेच वाईट प्रवृत्ती नष्ट होतात. तिळाचे तेल दीर्घकालीन समस्या दूर करण्यास मदत करतात आणि जीवनाचे अडथळेही दूर करतात.

● मोहरीचे तेल

दिवे पेटवण्यासाठी मोहरीचे तेल हा चांगला पर्याय आहे. दिवे पेटवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने शनिसंबंधित दोष दूर होतात. तसेच रोगांपासूनही मुक्ती मिळते.

● नारळाचे तेल

भारतात नारळाचे तेलही हा एक चांगला पर्याय आहे. असं म्हटलं जातं की पुजेच्या दिव्यांमध्ये या तेलाचा वापर केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. यासाठी तुम्ही दिव्यांमध्ये नारळाचे तेल वापरू शकता.

● पंचदीपम तेल

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पंचदीपा तेल अथवा पंचदीपम तेलाचा वापर करून दिवे पेटवले पाहिजेत. या तेलामुळे तुमच्या घरात सुख, स्वास्थ, धन, प्रसिद्धी आणि समृ्द्धी येते. पंच दीपम तेल हे योग्य आणि शुद्ध अशा 5 तेलांचे मिश्रण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

SCROLL FOR NEXT