Bali Pratipada sakal
संस्कृती

Bali Pratipada : वही पूजनाचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या पाडवा पूजा विधी

दिवाळीतील पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. या दीपोत्सवाची सुरुवातच गोमातेच्या पूजनाने होते व सांगता ही बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेने होत असते. या दिवाळीच्या उत्सवामध्येच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व त्याचप्रमाणे दीपावलीतील पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा यांसारखे महत्त्वाचे सण येत असतात.

दिवाळीतील पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात.

शुभ मुहूर्त : वही पूजनासाठी सकाळी 6:45 ते स.9:30 ही शुभ वेळ असून सकाळी 11 ते दु.12:15 व दु.4:30 ते सायं.6 या वेळीदेखील वहीपूजन करता येईल.ज्यांना सायंकाळी वही पूजन करायचे आहे अशा व्यापाऱ्यांसाठी सायं.०७:४० ते सायं.०९:१० या वेळेत वहीपूजन करता येईल.

बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा केली जाते. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले होते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी लाभते. तुम्हाला माहिती आहे का राजा बळी कोण होता?

अशी एक आख्यायिका बोलली जाते की एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीन मागितली होती. राजा बळीने पहिली पायरी ब्रह्मांड आणि दुसरी पायरी पृथ्वी दिली होती. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारले तेव्हाबळीने त्याचे डोके पुढे केले.

वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच राजा बळी अधोलोकात पोहोचला. या वेळी विष्णू भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन प्रतिपदेला तुझी पूजा होईल, असा त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून राजा बळीची बलिप्रतिपदाला पूजा केली जाते.

पाडवा पूजा विधी

  • या दिवशी सुरवातीला बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करावे.

  • जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी.

  • या दिवशी पक्वान्नांचे भोजन करावे.

  • बळीला नैवेद्य दाखवावा.

  • यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे.

  • बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करावे.

  • या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रियांनी पतीला ओवाळावे.

  • व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते.

  • व्यापरी या दिवशी नव्या वह्यांचे पूजन केलं जातं. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police Viral Video : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली होताच महिला शिपायाने थेट पोलीस ठाण्यातच फोडले फटाके! अंधेरी पोलीस ठाण्यातील 'तो' प्रकार चर्चेत

IND vs PAK: सामना झालाच नाही, तरी पाकिस्तानला मिळाली चॅम्पियनची ट्रॉफी; ब्लाइंड क्रिकेट फायनलनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दोनच दिवसांत सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रद्द

New Honda Avancier SUV : ७ सीटर फॅमिली एसयूव्ही सेगमेंटमध्ये होंडाचा मोठा धमाका! नव्या 'H' लोगो, नेक्स्ट-जनरेशन हायब्रिड आणि इलेक्ट्रिक AWD सह 'अव्हान्सियर' सादर; भारतात कधी येणार?

ना मराठी मातृभाषा, ना महाराष्ट्र जन्मभूमी; तरीही परदेशी कलाकाराच्या मराठी प्रेमाची सोशल मीडियावर चर्चा!

SCROLL FOR NEXT