Diwali 2022 esakal
संस्कृती

Diwali Festival 2022 : दिवाळीच्या काळात या चुका अजिबात करु नका, अन्यथा...

सकाळ डिजिटल टीम

अंधःकारातून प्रकाशाकडे जाणारा अन् ज्याची लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वजण आतूरतेने वाट पाहात असतात असा दिवाळीचा सण जवळ आला आहे. देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिपोत्सवात चोहीकडे दिवे प्रज्वलित केल्याने तेजोमय वातावरण तयार होते. या दिवसात धन्वंतरी, लक्ष्मी, कुबेर या देवांची मनोभावे आराधना केली जाते.

निरामय आरोग्य अन् सुख-समृद्धीचा सण म्हणजे दिवाळी असे मानले जाते. मात्र दिवाळीचा सण साजरा करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ज्यात काही साधारण चुका मात्र ज्याचे फळ मोठे असते अशा चुका आपल्या हातून होऊ नये याची काळजी घ्यावी जेणेकरुन देवी लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. चला तर जाणून घेवूया दिवाळीच्या पर्वात कोणती काळजी घ्यावी. (Dont make these common mistakes during Diwali Dhanteras Narak chaturdashi Lakshmi pujan festival)

दिवाळीच्या पर्वात कोणती काळजी घ्यावी यावर ज्योतिष तज्ज्ञ विजय जोशी सांगतात, दिवाळी हा सुख-समृद्धी देणारा देवी लक्ष्मीचा प्रधान सण आहे. या सणाला देवीची मनोभावे मोठ्या भक्तीभावाने पुजा केली जाते. आणि असं म्हटल जात 'जेथे स्वच्छता नाही तेथे लक्ष्मी वास करत नाही' त्यामुळे लक्ष्मीपुजन करण्यापुर्वी घराची संपुर्ण स्वच्छता करुन घ्यावी. जेणेकरुन लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहील.

दिवाळीच्या पर्वात सायंकाळी झोपणे टाळावे. ही वेळ लक्ष्मी घरात येण्याची असते आणि अशावेळेत आपण निद्रावस्थेत असलो तर देवी घरात थांबत नाही. ही सुचना केवळ दिवाळीसाठी नसून दैनंदिन जिवनासाठीही आहे असे श्री. जोशी सांगतात.

दिवाळी हा भक्तीभावाने साजरा करण्याचा एक सण आहे त्यामुळे या काळात कोणतेही व्यसन करु नये. मांसाहारी भोजन टाळावे. यासह घरात किंवा बाहेर कोणाशीही वादविवाद करु नये. असे केल्यास कुटुंबात दारिद्रता येते.

दिवाळी सणाच्या पर्वात धनत्रयोदशीला यम आणि धन्वंतरी पुजनाचे विशेष महत्व आहे. यम हा पाण्याच्या तीरावर राहतो तर भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनावेळी पाण्यातून प्रकट झाले. त्यामुळे या दिवशी जलपूजन जरुर करावे. यासह पाण्याच्या स्त्रोतांजवळ दिवा लावावा, ज्यामुळे दोन्ही देव प्रसन्न राहतात. असे केल्याने संपुर्ण कुटुंब आरोग्य संपन्न राहते आणि दुःख, पिडांचे निवारण या देवतांच्या आशिर्वादाने होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT