Hindu Marriage Rituals sakal
संस्कृती

Hindu Marriage Rituals : हिंदू विवाहाच्या वेळी वधू वराच्या डाव्या बाजूलाच का बसते? जाणून घ्या खरं कारण

या मागील खरं कारण काय आणि त्याचं महत्त्व काय, या विषयी आपण जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Hindu Marriage Rituals : हिंदू विवाह वेगवेगळ्या रुढी परंपरेनुसार केला जातो. हळद, मेहंदीपासून सप्तपदीपर्यंतच्या सर्व परंपरा चार पाच दिवस चालतात. यातलीच एक परंपरा अशी असते की धर्मपत्नीला आयुष्यभर निभवावी लागते. नवरी मुलीला मुलाच्या डाव्या बाजूला बसावे लागते.

शास्त्रानुसार लग्न किंवा शुभ कार्यात पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला बसावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का पत्नी पतीच्या डाव्या बाजूला का बसते? या मागील खरं कारण काय आणि त्याचं महत्त्व काय, या विषयी आपण जाणून घेणार आहोत. (Hindu Marriage Rituals wedding traditions why bride always sitting on left side of groom read story)

भगवान शिवशी संबंधीत

हिंदू धर्मात कोणत्याही पूजा-पाठ, धार्मिक कार्यक्रमात, एवढंच काय तर लग्नसमारंभात पत्नीला पतीच्या डाव्या बाजूलाच बसावे लागते. यामुळेच पत्नीला 'वामांगी' म्हटले जाते. ज्याचं कारण म्हणजे डाव्या बाजूचा अधिकारी असतो.

भगवान शिवच्या अंगातून स्त्रीची उत्पत्ती झाली होती ज्याचं एक प्रतीक आहे शिवजीचं अर्धनारीश्वर स्वरुप.

व्यक्तिच्या हृदयाशी संबंधित

असं म्हटलं जातं की जर पत्नी पतिच्या डाव्या बाजूला बसली की ती नेहमी पतीच्या हृदयात असते. यामुळे आयुष्यभर वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख समृद्धी असते

डावा हात प्रेमाचा प्रतीक

एका मान्यतेनुसार डावा हात हा प्रेमाचा आणि सौहार्दचं प्रतीक मानलं जातं. या कारणामुळे पत्नीला नवऱ्याच्या डाव्या बाजूला बसण्यास सांगितलं जातं ज्यामुळे वरवधूमध्ये प्रेम दिसून येतं.

भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीशी संबंध

शास्त्रानुसार माता लक्ष्मी नेहमी भगवान विष्णुच्या डाव्या बाजूला बसते. यामुळे नवरीला माता लक्ष्मी आणि नवरदेवाला विष्णुजी रुप मानलं जातं. या कारणामुळे लग्नात नवरी डाव्या बाजूला बसते ज्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेमुळे जोडप्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई-पुणे महामार्गावरील बोर घाटात अवजड वाहनांना बंदी

Kavthe Yamai Crime : ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; पोलिसांना खुनाचा संशय

SCROLL FOR NEXT