Kunti And Shri Krishna Relation esakal
संस्कृती

Kunti And Shri Krishna Relation : भगवान श्री कृष्ण आणि माता कुंती यांच नातं काय?

श्री कृष्ण माता कुंतीला नेहमी अशीच हाक मारत होते

Pooja Karande-Kadam

Kunti And Krishna Relation : हिंदू धर्मातील वेद, पुराणे, ग्रंथांत आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये हिंदू धर्माची संस्कृती आणि वारसा सांगितला गेला आहे. या वेदपुराणांमध्ये जीवनपद्धतीसह धर्म आणि अधर्मयाविषयी उपदेश देण्यात आले आहेत. चार वेदांसह रामायण, महाभारत यांसारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक पौराणिक कथांचा उल्लेख आहे. रामायणात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आदर्श, न्याय आणि स्थापनेचे वर्णन आहे, तर महाभारतात भगवान श्रीकृष्णाची लीला आणि धर्मावरील अधर्माच्या विजयाचा उल्लेख आहे.

महाभारतात अनेक रंजक कथा ऐकायला मिळतात. काही किस्से आश्चर्यचकित करणारे आहेत. महाभारतात अनेक नावांचा उल्लेख आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्णासह अनेक शूर योद्धे आणि त्यांच्या पूर्वजांचे वर्णन करण्यात आले आहे. यात कुंती ही एक मुख्य व्यक्तिरेखाही आहे. कुंती ही पांडवांची आई आणि भगवान श्रीकृष्णाची आत्या होती.

माता कुंती कोण होत्या

कुंती माता या महाभारतातील हस्तिनापुराच्या पंडु राजाची पत्नी व पांडवांमधील युधिष्ठीर,  भीम आणि  अर्जुन यांची आई होती. तसेच, कर्णाची देखील ती आई होती. यादव कुळातील शूरसेनाची कन्या असलेल्या कुंती यांचे बालपणीचे नाव पृथा असे होते. निःसंतान असलेल्या कुंतिभोज राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव कुंति असे ठेवण्यात आले.

जर तुम्ही दूरदर्शनवर महाभारत पाहिलं किंवा वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की श्रीकृष्ण कुंतीला आत्या म्हणून संबोधत असत. अशा वेळी कुंती ही भगवान श्रीकृष्णाची आत्या होती. हे ही तुमच्या मनात आलं असेल. भगवान श्रीकृष्ण त्यांना आत्या का म्हणायचे? चला तर मग तुम्हाला सांगतो की कुंती कशी होती भगवान श्रीकृष्णाची आत्या.

कुंती ही यदुवंशी राजा शूरसेन यांची कन्या,कृष्णपिता वासुदेव आणि सुत्सुभा यांची मोठी बहीण होती. नागवंशी महाराज कुंतीभोज यांनी शुरसेन यांच्याकडून कुंती दत्तक घेतली. कुंती यांचे आधी पृथा हे नाव होते. पुढे महाराज कुंतीभोजांनी त्यांचे नाव कुंती ठेवले. कुंती हस्तिनापूरचे राजा महाराज पांडू यांची पहिली पत्नी होती.

कुंती मातेला दिले होते वरदान

कुंतिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषिंनी तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती. या पुत्राचे नाव कुंतिने कर्ण असे ठेवले.

ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती. या पुत्राचे नाव कुंतिने कर्ण असे ठेवले. परंतु अविवाहीत असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते म्हणून कुंति एका पेटीत विपुल धन ठेवून त्यामधे या पुत्राला ठेवते व ती पेटी नदीत सोडून देते. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या सूताला सापडते. तो या पुत्राला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT