Attract Positive Energy with These Sacred Practices On Mohini Ekadashi: दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी मोहिनी एकादशी साजरी केली जाते. यंदा ही तिथी आज म्हणजेच ८ मे रोजी आली आहे. हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या एकादशींपैकी मोहिनी एकादशी एक महत्त्वाची एकादशी आहे.
या दिवशी लोक श्रद्धेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करतात. असे मानले जाते की, या पूजेने आयुष्यातील अडचणी, रोग आणि संकटे दूर होतात. पुराणकथेनुसार, भगवान विष्णूंनी या दिवशी मोहिनीचे रूप घेतले होते, म्हणून या तिथीस 'मोहिनी एकादशी' असे नाव मिळाले आहे. या दिवशी व्रत केल्यास भगवान विष्णूची कृपा लाभते आणि जीवनात शुभ फलप्राप्ती होते.
तसेच या दिवशी अधिक पुण्य लाभावे आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी व्हावी म्हणून काही गोष्टी कराव्यात तर काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊया.
पूर्ण भक्तीभावाने व्रत पाळा
एकादशीला उपवास करणं महत्त्वाचं मानलं जातं. कोणाला जसं शक्य असेल, त्यांनी पाणीही न घेता उपवास (निर्जला) किंवा फक्त फळं-दूध घेत उपवास (फलाहार) करावा.
भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करा
पिवळी फुलं, तुळशीची पानं, फळं आणि गोड पदार्थ अर्पण करून विष्णू सहस्त्रनाम व लक्ष्मी स्तोत्रांचे पठण करा.
गरजू लोकांना अन्नदान व दक्षिणा द्या
एकादशीच्या दिवशी केलेले दानधर्म अनेक पटींनी पुण्यदायी मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान व ब्राह्मणांना दक्षिणा द्या.
सत्यनारायण कथा वाचा किंवा ऐका
या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते व धार्मिक मार्गावर मन केंद्रित होते.
तुळशीजवळ दिवा लावा
संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा त्यामुळे घरात शांती, सुख-समृद्धी आणि चांगली सकारात्मक ऊर्जा वाढते.
नदीत दीपदान करा
शक्य असेल तर सूर्यदेवाला पाणी अर्पण करा आणि पवित्र नदीत मातीचे दिवे सोडा. यामुळे पाप धुऊन निघते आणि पुण्य कर्माची फळे मिळतात.
स्वच्छता व सात्त्विक जीवनशैली ठेवा
लवकर उठून आंघोळ करावी, शुद्ध विचार, वाणी आणि वर्तन ठेवावं. खोटं बोलणं, रागावणं आणि वादविवाद टाळा.
अन्नधान्य खाणे टाळा
तांदूळ, गहू, डाळी, कडधान्ये यांचा त्याग करा. उपवासासाठी फळे, दूध, सुकामेवा अशा सात्विक पदार्थांचा वापर करा.
कांदा, लसूण व मांसाहार टाळा
हे तामसी पदार्थ अध्यात्मिक चैतन्य कमी करतात व मन विचलित करतात.
निंदानालस्ती आणि वादविवाद टाळा
गप्पाटप्पा, निंदा, असत्य बोलणे किंवा कोणावर टीका करणे हे कार्य टाळा.
दिवसा झोपणे टाळा
दिवसा झोपल्याने व्रताचे पुण्य कमी होते. दिवसभर देवाचे नामस्मरण करा.
केस व नख कापू नका
अनेक धार्मिक सणांप्रमाणेच एकादशीच्या दिवशी केस व नख कापणे वर्ज्य मानले जाते.
आरती व भजन टाळू नका
संध्याकाळची आरती, भजन-कीर्तन यामध्ये आवर्जून सहभागी व्हा. त्यातून अध्यात्मिक समाधान मिळते.
व्रत मोडताना अयोग्य वेळ टाळा
दुसऱ्या दिवशी योग्य वेळेतच व्रत समाप्त करा. चुकीच्या वेळी उपवास सोडल्यास त्याचे पुण्य कमी होते.
मोहिनी एकादशीला या गोष्टी पाळल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती नांदते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.