Astro Tips
Astro Tips Sakal
संस्कृती

Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?

सकाळ डिजिटल टीम

घरात कोणतीही अडचण आली किंवा कोणाचा जीव धोक्यात असेल तर देवाचे नामस्मरण करण्याचा उपाय शास्त्रात सांगितला आहे. कारण धार्मिक मान्यतांनुसार, नामस्मरणात इतकी शक्ती असते की त्यांचा नियमित जप केल्यास मोठी समस्या दूर होऊ शकते. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे, ती व्यक्ती भगवंतांचे नामस्मरण नेहमी करत असते. नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे.

देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे. नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे. नापजप हा कोणालाही हानिकारक नाही. नामजपाला वयाचे बंधन नसते. नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो. नामस्मरण करताना कोणत्या माळा अधिक लाभदायक ठरू शकतात, जाणून घेऊया.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

शास्त्रानुसार योग्य नामस्मरण कसे करावे

साधना म्हणून उजव्या हातात पुढीलप्रमाणे माळ धरून जप करावा. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे अंगठ्याने ओढावेत. माळेला तर्जनीचा स्पर्श होऊ देऊ नये. अनामिकेवर माळ ठेवून अनामिका आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडावी. नंतर मधल्या बोटाने माळ ओढावी.

प्रत्येक देवतेशी संबंधित मंत्रांचा जप एकाच माळाने केला जातो अशी समजूत आपली आहे. पण, शास्त्रात प्रत्येक देवासाठी वेगवेगळी जपमाळ वापरण्यास सांगितले जाते. भोपाळचे प्रसिद्ध ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा वेगवेगळ्या देवतांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या हारांचे महत्त्व सांगत आहेत.

मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी प्रवाळ दगडाच्या जपमाळाने मंत्रोत्चार करावा. मारूतीरायाला प्रसन्न करायचे असल्यास या माळेने जप करावा. मंत्रांचा जप मंगळाच्या शांतीसाठी लाभदायक मानला जातो. तसेच यामूळे नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळते.

भगवान शंकरांच्या पूजेत नेहमी शंख आणि मोती वापरले जातात. शंखाच्या सहाय्याने पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामूळे मोती माळेने जप केल्याने माणसाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. मोतीचा गुणधर्म शांत असल्याने ज्यांच्या राशीत चंद्राशी संबंधित दोष आहेत तेही दूर होतात. काली माता, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कमळाच्या फुलांनी पूजा केली जाते. त्यामूळे या देवतांचे नामस्मरण करताना कमळाचे गट्टे माळा घालून पूजा करण्याचा नियम आहे.

शास्त्रानुसार स्फटिक हे पंचमुखी ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांची स्फटिक माला घालून पूजा करणे शुभ मानले जाते. स्फटिकाच्या मण्यांनीही इतर मंत्रांचा जप करता येतो. या मंत्राने लवकर सिद्ध होते आणि घरातील दु:ख आणि दारिद्र्य दूर होते. सूर्य देवाला प्रसन्न करून पूजन करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्रांचा माणिकाच्या माळाने जप केल्यास लाभ होतो. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT