Auspicious Gift for Bride esakal
संस्कृती

Best Wedding Gift : लाडक्या लेकीला चुकूनही देऊ नका 'या' भेटवस्तू; आयुष्यभर होईल सासरच्यांकडून त्रास

Best Wedding Gift ideas: आपण आपल्या लेकीला फुला सारखं जपतो पण जर त्याच मुलीला लग्नानंतर त्रास झाला तर कोणाला आवडेल?

सकाळ डिजिटल टीम

Auspicious Gift for Bride : असे कोणतेच आई बाबा नाहीत जे आपल्या मुलीच्या लग्नाचे तिच्या सुखी संसाराचे स्वप्न बघितले नसतील.

अगदी तिच्या जन्मापासून आपण हीच लग्न असं लावू, अशा गोष्टी देऊ, साध्या साड्या नाही घेयच्या सगळ्या जरीकाठाच्या पैठण्या घेयच्या, हे आणि असे कित्येक. आपण आपल्या लेकीला फुला सारखं जपतो पण जर त्याच मुलीला लग्नानंतर त्रास झाला तर कोणाला आवडेल?

लग्नात आपण आपल्या लेकीला अनेक भेटवस्तू देत असतो, शिवाय तिला रुखवत देण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामुळे आपण तिला भांडी कुंडी सुद्धा भेटवस्तू म्हणून देत असतो.

पाठवणी करतांना आपल्या लेकीला भेटवस्तू देण्याची खूप जुनी परंपरा आहे, सगळे आई-बाबा आपल्या मुलीला तिच्या सुखासाठी काही काही शुभ वस्तू देत असतात पण हे देतांना नक्की काय द्यावं आणि काय देऊ नाही यात गल्लत करु नका. चुकूनही दिलेल्या या वस्तूंमुळे तुमच्या लेकीला तिच्या सासरी खूप त्रास होऊ शकतो.

१. लोणच :

पाठवणीच्या वेळी मिठाई सोबत आपण अनेक खाण्या-पिण्याच्या वस्तू देत असतो, काही लोकांमध्ये तर अगदी साखर आणि चहा पावडर सुद्धा दिली जाते, अशात आपल्या लेकीला चुकूनही लोणच देऊ नका. असं म्हणतात की लोणाच्याची मूळ चव ही थोडी तिखट असते आणि अशात लेकीला असं लोणच दिलं तर तिच्या नवीन घरातही तसंच वातावरण निर्माण होऊ शकतं.

२. केरसुणी :

अनेकदा आई-वडील आपल्या मुलीच्या सुख सुविधांकडे लक्ष देत तिला तिच्या नवीन घरासाठी म्हणून अनेक गोष्टी भेटवस्तू देतात, त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू किंवा केरसुणी, आणि हे चुकीचं आहे. आपल्या लेकीला झाडू किंवा इतर साफ-सफाईशी संबंधित वस्तू देयला नको. अशाने तिच्या आयुष्यात चलबिचलता येते आणि उगाच वादांना आमंत्रण मिळतं.

३. टोकदार वस्तू :

आपण लग्नात रुखवत सजवतांना बघितलं असेलच, सगळेच वेगवेगळ्या पद्धतीचं रुखवत सजवत असतात. यातल्या अनेक गोष्टी ह्या किचनच्या सामानाशी रिलेटेड असतात अशात त्यात चुकूनही सुई, सूरी, विळी, चाकू अशा टोकदार गोष्टी देऊ नये. कारण यामुळे तुमच्या लेकीच्या आणि जावयाच्या आयुष्यात संकट येऊ शकतं, त्या दांपत्यामध्ये दुरावा येऊ शकतो.

४. चाळणी :

लेकीच्या लग्नात तिला चाळणी कधीच देऊ नका, कणिक चाळायला, पोहे चाळायला किंवा धान्य चाळायला सुद्धा आपण अनेकदा चाळणी वापरतो, ती चाळणी चुकूनही लेकीला भेट म्हणून देऊ नका. शिवाय चुकूनही चहा गाळण सुद्धा देऊ नका असं म्हणतात याने त्यांच्या आयुष्यात कधीच सुख टिकत नाही उलट काहीना काही सतत कमी आहे असं वाटत रहातं.

५. पोळपाट :

असं म्हणतात आईने आपल्या लेकीला कधीही पोळपाट देऊ नाही. वर्षानुवर्ष ही प्रथा आहे, अगदीच गरज असेल तर लग्नानंतर दुसऱ्या कोणत्या नातेवाईकाला तिला पोळपाट घेऊन देयला सांगा. पण लग्नाच्यावेळी पाठवणी करतांना चुकूनही या वस्तू देऊ नका.

या ५ गोष्टी चुकूनही आपल्या लेकीला देऊ नका, अगदी लग्नात असं नाही पण इतरही वेळी या गोष्टी तिला देऊ नका.

अगदी ती कितीही हट्ट करत असेल तरीही आणि असं झालच की तुम्ही तिला या गोष्टी दिल्या असतील तर लगेच त्याचे पैसे मागून घ्या. अगदी स्वतःच्या इच्छेने काही पैसे दिलेत तरीही चालेल पण तिला फुकटात देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Travel : ताजमहलाच्या खऱ्या कबरींचे रहस्य अखेर उघडले, २२ फूट खोल तळघरातील Video viral

ईदला नाहीतर आता 12 जूनला येतोय 'धमाल 4', 'या' कारणामुळे बदलली प्रदर्शनाची तारीख

Shankarpat competition: महिला शंकरपटात लक्ष्मी सोनबावणेने रचला इतिहास! सुंदर-राघव बैलजोडी अव्वल, मल्हार-मोगली दुसऱ्या स्थानी..

UP Health : आरोग्य क्षेत्रात यूपीची 'सुपरफास्ट' प्रगती! २ एम्स आणि ८१ मेडिकल कॉलेजसह बनणार देशाची'आरोग्य राजधानी'

Mumbai Marathon 2026: कोस्टल रोडचे अप्रूप आणि दमछाकही; चढ-उतारामुळे धावपटूंना त्रास, काहींची माघार

SCROLL FOR NEXT