chanakya niti for parents
chanakya niti for parents Esakal
संस्कृती

Chanakya Niti: मुलांना गुणवान बनवायचं असेल, तर आचार्य चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी आचरणात आणा

Kirti Wadkar

Chanakya Niti for parents: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात जीवनातील सर्व पैलूंचा उल्लेख करताना सैद्धांतिक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीं आचरणात आणल्या तर सुख-समृद्धीसोबतच Prosperity प्रसिद्धी देखील प्राप्त होईल. Parenting and Child Development Tips By Chankya Niti

आचार्यांच्या तत्वांचं पालन केल्यास कुटुंबियांसोबत सुखी जीवनाचा आनंद घेणं शक्य आहे. आचार्य म्हणाले आहेत त्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीसाठी आपलं मूलं Kids सुखी आणि गुणवान असणं यापेक्षा मोठा आनंद Happiness नाही. 

आचार्य चाणक्य यांची धोरणं आजही प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्य हे भारतातील महान शिक्षणतज्ञ, अर्थसास्त्रज्ञ, राजकारणी आणि मुत्सद्दी होते.

आचार्य चाणक्यांनी एका श्लोकाच्या माध्यमातून आई- वडिलांली आपलं मूल कसं गुणवान बनवावं याच्या नीतिचा उल्लेख केला आहे. आई- वडिलांनी कोणत्या नियमांचं पालन केल्यास त्यांच संतान गुणवान होईल हे सांगितलं आहे. 

लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणा:|

तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत्||

या श्लोकामध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की जास्त लाड प्रेम केल्याने मुलांमध्ये दोष निर्माण होवू शकतात. मुलांना योग्य शिक्षा दिल्याने आणि त्यांची परीक्षा घेतल्याने त्यांच्यामध्ये आयुष्य जगण्यासाठीचे आवश्यक गुण विकसित होतात.

मूलं आणि विद्यार्थ्यांचे कधीही अति लाड करू नये असं आचार्य म्हणतात. त्याएवजी त्यांना शिक्षा करून त्यांना कठीण परिस्थितीसाठी बळकट बनवलं पाहिजे. 

हे देखिल वाचा-

मुलांवर प्रेम करा मात्र अवगुण दुर्लक्ष करू नका

मुलांवर प्रेम करत असताना त्यांच्या चुकांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. त्यांच्या चुका सुधारण्यासाठी वेळीच त्यांना शिक्षा द्या किंवा त्या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी योग्य शिकवणूक द्या. 

चारचौघात मुलांवर ओरडू नका

मुलांना कधीही एकांतात ओरडावं. इतर मुलांसमोर किंवा अनोळखी लोकांसमोर मुलांना ओरडू नये किंवा त्यांचा अपमान करू नये. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होवू शकतो. शिवाय त्यांची प्रगती मंदावू शकते. 

मूलं काय करत आहेत यावर लक्ष ठेवा

आचार्यांच्या नीतिनुसार जर मुलं चुकली असतील तर सर्व प्रथम त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना चुकीच्या व्यक्तींपासून किंवा गोष्टींपासून दूर ठेवा. आई-वडिलांनी मुलांच्या प्रत्येत बारीक हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 

आपली मुलं कोणच्या मुलांसोबत वावरत आहेत. ते दिवसभर काय करत आहेत हे आई वडिलांना ठाऊक असणं गरजेचं आहे. 

वरमेको गुणी पुत्रो निर्ग्रणैश्च शतैरपि।

एकश्चन्द्रस्तमो हन्ति न च ताराः सहस्त्रशः

आचार्य चाणक्य म्हणतात शेकडो मूर्ख मुलांच्या तुलनेत केवळ एकच विद्वान पुत्र कुटुंबाचं कल्याण करू शकतो आणि कुटुंबाचं आणि कुळाचं नाव राखू शकतो. मुलांनी कायम विद्यार्जन करावं आणि कुळाचं नाव गौरवावं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT