Astrology Horoscope pet esakal
संस्कृती

Astrology Horoscope : पाळीव प्राण्यांचा कुंडलीतील ग्रहांवर होतो मोठा परिणाम; हा प्राणी विशेष महत्वाचा

सकाळ डिजिटल टीम

Astrology Horoscope : बहुतेक कुटुंबांमध्ये पाळीव प्राणी पाळले जातात. या पाळीव प्राण्यांशी अनेकांचे घट्ट नाते तयार होत जाते. यात प्रामुख्याने कुत्रा, मांजरांचा समावेश असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? पाळीव प्राणी पाळण्याचा परिणाम आपल्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांवर देखील होत असतो. चला तर जाणून घेवूया याचे विशेष महत्व.

(Pets have effect on planets in horoscope astrology rahu ketu pitru dosh)

हा प्राणी पाळणे ज्योतिष शास्त्रात महत्वाचे

घरात पाळीव प्राणी पाळल्याने कुंडलीतील महत्त्वाच्या ग्रहांवर मोठा प्रभाव पडतो. यात प्रामुख्याने कुत्रा हा प्राणी महत्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रात कुत्र्याचा राहूशी महत्त्वाचा संबंध आहे. कुत्र्याला त्रास देणे किंवा त्याची सेवा केल्याने केतू ग्रहावर सर्वात मोठा प्रभाव पडतो.

का आहे कुत्र्याला एव्हढे महत्व...?

यावर ज्योतिष अभ्यासक प्रमोद जोशी सांगतात, आपण पाहिल असेल ज्यावेळी आपण दत्त गुरुंच्या फोटोला नमस्कार करतो त्यावेळी त्या फोटोमध्ये गायीसह आपल्याला कुत्रा देखील दिसतो. कुत्र्याचा राहुशी संबंध येत असल्याने पितृदोषातही कुत्र्याला विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रात असेही सांगितले आहे की काही लोकांसाठी कुत्रा घरात ठेवणे शुभ तर काही लोकांसाठी अशुभ आहे. ते आपण जाणून घेवूया.

कुत्रा कोणी पाळावा...?

ज्या लोकांच्या कुंडलीत केतु ग्रह सकारात्मक असतो त्यांच्यासाठी कुत्रा पाळणे शुभ असते. केतू ग्रहाचे कुत्रा पाळल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. प्रत्येक कामात यश मिळते. उत्तम आरोग्य प्राप्त होते. कुंडलीत राहू-केतू हे ग्रह अशुभ योग करत असतील तर कुत्रा पाळणे किंवा कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे उपयुक्त ठरते. यामुळे प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि यश मिळते. कुटुंबात सदैव आनंदी वातावरण राहते.

कुत्रा हा कालभैरवाचा सेवक

कुत्रा हा कालभैरवाचा सेवक मानला जातो. त्यामुळे कुत्र्याची सेवा केल्याने कालभैरव प्रसन्न होतात आणि आपले संकटांपासून रक्षण करतात. यासह काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने शनिदेव प्रसन्न होतात व शुभ फळ देतात. यासह काळ्या कुत्र्याला दररोज स्पर्ष जरी केला तरी पितृदोष निवारण होतो कारण ज्योतिषशास्त्रात कुत्र्याचा राहूशी महत्त्वाचा संबंध आहे असे श्री. जोशी सांगतात.

कुत्रा कोणी पाळू नये...?

यावर ज्योतिष अभ्यासक प्रमोद जोशी सांगतात, ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह चढ्या किंवा अशुभ स्थितीत असेल त्यांनी कुत्रा पाळू नये. अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जसे कि पैशांची कमतरता असणे, सतत कामानिमीत्त बाहेर असल्याने कुटुंबियांसोबत राहाता न येणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होणे, घरातील माणसे नशेच्या आहारी जाणे. एकंदरीत कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या परिस्थिती उद्भवू शकतात त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत असा योग आहे त्यांनी शक्यतोवर पाळीव प्राणी म्हणून कुत्रा पाळू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT