raksha bandhan 2022 esakal
संस्कृती

Raksha bandhan 2022 date : यंदा रक्षाबंधन कधी? तारीख आणि तिथीमधील फरक जाणून घ्या

या वर्षी कॅलेंडरमध्ये या सणाची तिथी आणि तारीख बघताना थोडासा गोंधळ होतो.

प्रतीक जोशी

श्रावण महिना सुरु होताच सणांची मांदियाळी सुरु होते. भाविक भक्त या काळात भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन होवून जातात. याच महिन्यामध्ये भावा- बहिणीच्या गोड नात्याची गाठ अधिक घट्ट करणारा अन् संपुर्ण कुटुंबाच्या आनंदाला उधाण आणणारा रक्षाबंधन सण येतो. मात्र या वर्षी कॅलेंडरमध्ये या सणाची तिथी आणि तारीख बघताना थोडासा गोंधळ होतो. नेमका काय आहे हा गोंधळ आणि नेमके मग हे सण आपण कधी आणि कसे साजरे करावे हे आपण आता जाणून घेवूया. (Raksha Bandhan 2022 Date and Muhurat)

यंदा नेमकं काय झालंय?

आपण आपले सण साजरे करताना त्याची तारीख जरी कॅलेंडर मध्ये बघत असलो तरी साजरे मात्र आपण मराठी वर्षाप्रमाणे म्हणजेच तारीख नाही तर तिथी प्रमाणे साजरे करतो. श्रावण शुक्ल १५ म्हणजेच पौर्णिमा यादिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. यालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. आता यावर्षी ही तिथी कुठल्या तारखेला येते यासाठी कॅलेंडर पाहिले असता रक्षाबंधन हे ११ ऑगस्टला दिसते मात्र यादिवशी तिथी ही श्रावण शुक्ल १४ दिसते. म्हणजे पौर्णिमा दिसत नाही. आता तिथी त्या सणाची नाही मग या तारखेला रक्षाबंधन कसे साजरे करावे असा प्रश्‍न आपसूकपणे तयार होतो. याचेचे उत्तर आपण जाणून घेतोय. (Latest Marathi News)

तारीख आणि तिथीमध्ये असा फरक का होतो...?

तारीख आणि तिथीमध्ये असा फरक का होतो यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, कुठलीही तिथी ही पृथ्वीच्या परिचलनाच्या गतीशी निगडीत असते. मराठी वर्षाचे कॅलेंडर हे वैदिक गणितानुसार तयार केले जाते. त्यामुळे या तिथीची वेळ ही कमी जास्त होत असते. आपण पाहतो ती तारीख घडाळाप्रमाणे आपल्याला दिसते आणि तिथीची वेळ ही वैदिक गणिताप्रमाणे असते त्यामुळे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे तारीख आणि तिथीच्या वेळेचे गणित असे बदलते. (Raksha bandhan 2022 Tithi in Marathi)

मग सण नेमका कधी साजरा करावा...?

रक्षाबंधन हा सण पौर्णिमेला येतो. आणि वैदिक गणिता प्रमाणे रात्रीची दिसणारी पौर्णिमा ही त्यादिवसाची तिथी मानली जाते. मग ११ तारखेला पौर्णिमा तिथी सकाळी ११ वाजता सुरु होणार असून १२ तारखेला सकाळी ७ वाजता संपणारी आहे. त्यामुळे पौर्णिमा ११ तारखेची मानण्यात आल्याने रक्षाबंधन देखील ११ ऑगस्टलाच साजरे करावे.

एकूणच काय तर आपल्या घरातील इंग्रजी वर्षाच्या कॅलेंडरवर दिलेल्या तारखेरप्रमाणे मात्र मराठी कॅलेंडरच्या तिथीप्रमाणे आनंद, उत्साह अन् जल्लोषाने आपले सण साजरे करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT