Saptashrungi temple esakal
संस्कृती

मंत्रघोष आणि जयघोषात खुले झाले आदिमाया सप्तशृंगीचे मंदीर

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते', चा परोहितांचा मंत्रघोष व हजारो भाविकांच्या 'अंबे माता की जय', 'सप्तश्रृंगी माते की जय' च्या जयघोषात तब्बत सात महिन्यानंतर आदिमाया सप्तशृंगी मंदीराचा द्वार भाविकांना खुले झाले आणि मांगल्याचे, चैत्यन्याचे व उत्साहाचे प्रतिक असलेल्या आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेच्या नवरात्रीपर्वाला मोठ्या भक्तीमय वातवरणात सुरुवात झाली. दरम्यान आदिमायेच्या चरणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नतमस्तक होत कोरोनारुपी (Corona) संकटाचे निवारण व्हावे मंदीर पुन्हा बंद करण्याची वेळ येवू नये यासाठी प्रार्थना करीत आदिमायेस साकडे घातले.

ढोल- ताशांच्या गजरात देवीच्या आभुषणांची मिरवणूक

काल घटस्थापनेच्या पूर्व संध्येलाच घटस्थापनेसाठी हजारो भाविकांबरोबरच पोलिसांचा लवाजमा, इतर प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल झाली होती. आज सकाळी 7 वा. सप्तश्रृंगी निवासिनी देवी न्यासाच्या कार्यालयापासून पूरोहितांना पुजेची वर्णी दक्षणा देवून देवीच्या आभुषणांची न्यासाच्या कार्यालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक तथा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आभुषणांची ढोल- ताशांच्या गजरात कोविड (Covid) नियमांचे पालन करीत न्यासाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित व सप्तश्रृंगीच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते सपत्नीक देवीची पंचामृत महापुजा व अभिषेेक करण्यात आला.

पंचामृत महापुजा व अभिषेेक झाल्यानंतर देवीला आंबा रंगाची पैठणी नेसवून सोन्याचे मुकुट, कमरपट्टा, नथनी, पावले, मंगळसूत्र, मयुर हार, पुतळी गाठले, तोडे, कर्ण फुले आदी दागिन्यांचा साजशृंगार चढविण्यात येऊन आरती संपन्न झाली.

गेले तीन उत्सव कोविडमूळे न झाल्याने भाविकांना उत्सवा दरम्यान दर्शनाचा लाभ घेता आला नव्हता. मात्र आज पासून मंदीर खुले झाल्याने भाविकांमध्ये तसेच व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. न्यासाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक तथा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई, तहसिलदार तथा विश्वस्त बंडू कापसे, ॲड ललीत निकम, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भुषण तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा दणका

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT