Shardiya Navratri Article by Nikhil Panditrao
Shardiya Navratri Article by Nikhil Panditrao esakal
संस्कृती

Navratri Festival 2023 : नवरात्रोत्सव म्हणजे काय? उत्सवात 'हिरण्यगर्भ'चं काय आहे महत्त्व? जाणून घ्या..

निखिल पंडितराव

आनंदमय कोश म्हणजे परमात्मतत्त्वाची जाणीव/अस्तित्व अशी धारणा आहे.

Navratri Festival 2023 : वेदांचे एकूण सार पाहिल्यास हे लक्षात येते की, चराचर सृष्टीमध्ये एक अंतर्गत ऊर्जा दडलेली असतेच. ही ऊर्जा आपल्याला प्रत्येक कार्यासाठी बळ देत राहते. हे बळ, ही ऊर्जा अनुभवायला हवी. ही ऊर्जा म्हणजेच हिरण्यगर्भ होय.

देवीचा नवरात्रोत्सव म्हणजे ऊर्जेचा, शक्ती उपासना-साधना करण्याचा उत्सव. या कालावधीत शक्ती उपासनेच्या विविध पद्धती अवलंबल्या जातात. कारण उपासनेमधून प्रत्येकाला कायिक, वाचिक, मानसिक स्तरावर एक वेगळी ऊर्जा मिळत असते. ही ऊर्जा कशी पाहावी, कशी मिळवावी, या विचारविनिमयामधूनच देवीच्या स्वरूपांची/अवतारांची निर्मिती झाली.

अंतरंगातील ऊर्जा पाहण्यासाठी देवीच्या या बाह्यस्वरूपाचा अवलंब करण्यात आला. देवीमूर्तीव्यतिरिक्त आपल्यात असणाऱ्या या ऊर्जेच्या अनुषंगाने वेद, उपनिषदांमध्ये विविध अंगांनी चर्चा केली आहे. वेदांचे सार पाहिले, तर हे लक्षात येते की, चराचर सृष्टीमध्ये एक अंतर्गत ऊर्जा दडलेली असतेच. ही ऊर्जा प्रत्येक कार्यासाठी बळ देत राहते. ही ऊर्जा म्हणजेच हिरण्यगर्भ होय. हिरण्यगर्भ याचा अर्थ सोन्याचा तेजोमय गोल आकार. तो सतत झळाळत असतो, तेज आणि ऊर्जा प्रसवत असतो. ही मध्यवर्ती संकल्पना वैदिक साहित्यामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये ग्राह्य धरली आहे.

आपल्याकडे आध्यात्मिक पातळीवर वेद-वेदांतांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार केला असता, शरीर-रचनेचे तीन भाग सांगितले आहेत. योगशास्त्रातही या अनुषंगाने विचार मांडला आहे. आपण बाह्य शरीर आणि अंतःशरीर असे सर्वसाधारण मानतो. आध्यात्मिक पातळीवर शरीराची तीन ठिकाणी विभागणी केली आहे. स्थूल (शरीर), सूक्ष्म (मन) आणि कारण (आत्मा) शरीर असल्याचे मानले जाते. त्यामध्ये स्थूल शरीरात अन्नमय कोश, सूक्ष्म शरीरात मनोमय, प्राणमय, विज्ञानमय कोश आणि कारण शरीरात आनंदमय कोश अशी विभागणी केली आहे.

आनंदमय कोश म्हणजे परमात्मतत्त्वाची जाणीव/अस्तित्व अशी धारणा आहे. शरीराची ही विभागणी केली असली, तरी यातील प्रमुख हेतू हा शरीरातील अंतर्गत ऊर्जा चेतवणे आणि त्या शक्तीच्या नित्य अनुसंधानात राहणे हा आहे. ऊर्जेच्या अखंड, अबाधित स्वरूपालाच ‘हिरण्यगर्भ’ असे नाव आहे. या अंतरंग ऊर्जेला चैतन्य ऊर्जा म्हणून देखील ओळखले जाते.

ऊर्जा ओळखायला हवी

काहींनाच ही ऊर्जा मिळते आणि काहीजणांना मिळत नाही किंवा एखाद्याला दैवी शक्ती प्राप्त झाली आणि एखाद्याला होणार नाही, असे काहीही नसते. अंत:स्थ ऊर्जा ओळखणे आणि त्या ऊर्जेच्या जवळ जाण्याचे मार्ग निवडून तिला सतत जागृत ठेवणे एवढेच महत्त्वाचे आहे. ही ऊर्जा चराचर सृष्टीमध्ये भरलेलीच आहे. इथे आपण मनुष्याचाच फक्त विचार केला, तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ही ऊर्जा सुप्त स्वरूपात असतेच. ती ऊर्जा ओळखून तिच्याशी जोडले जाणे हे महत्त्वाचे असते.

यासाठी उपनिषदांमध्ये एक उदाहरण वारंवार देण्यात येते, ज्या पद्धतीने एखादी बी असते. ती बी पेरली तर त्यातून अंकुर येतो. रोपटे होते आणि कालांतराने वृक्ष होतो; परंतु आपण जर ती बी फोडली तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीचा अंकुर, रोपटे दिसत नाही; पण त्यामध्ये अंकुर येऊन वृक्ष होण्याची ऊर्जा असतेच.

ही ऊर्जा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. अनेकवेळा या बीला विशिष्ट पद्धतीने पोषण मिळाले नाही, तर त्यातून अंकुर फुटत नाही आणि मग ती बी तशीच राहते, या पद्धतीने आपल्या शरीरातील ऊर्जेचे आहे. हिरण्यगर्भाची ऊर्जा जागवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी योगशास्त्रामध्ये चर्चा आणि विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

अंतर्मुख आणि बहिर्मुख ऊर्जा

योगशास्त्र प्रत्येक व्यक्तीच्या सूक्ष्मदेहामध्ये सहा प्रमुख ऊर्जेची केंद्रे असल्याचे मान्य करते आणि त्यातूनच आपल्या शरीरातील ऊर्जेचे वहन होते, असे मानते. या ऊर्जाकेंद्रांना चक्र अशी संज्ञा देण्यात आलेली आहे आणि हिरण्यगर्भ या चैतन्य ऊर्जेचा उगमस्थान आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ही ऊर्जा दोन प्रकारे कार्यरत असते. एक म्हणजे बहिर्मुख आणि दुसरी म्हणजे अंतर्मुख. बहिर्मुख ऊर्जा ही जीवसृष्टीच्या कार्यकलापसाठी असते. ही ऊर्जा मनावर काम करते आणि मग मन बुद्धीकडे सूचना पाठवून शरीराद्वारे हवे असलेले कार्य करून घेते.

ही ऊर्जा इंद्रिय, मन यांसह आपल्या शरीरातील विविध १९ तत्त्वांवर काम करते. हीच ऊर्जा आरोग्याचीही कारक असते. हीच ऊर्जा अंतर्मुख केली की मानसिक, बौद्धिक, आत्मिक विकास होतो. अंतर्मुख असो वा बहिर्मुख; अंतरंगातील ही ऊर्जा शरीराला, मनाला, बुद्धीला विशेष चैतन्य प्रदान करते, हे नक्की. हिरण्यगर्भाच्या या ऊर्जेला आदिती, आदिशक्ती या विविध नावांनी ओळखले गेले आहे.

चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाच्या शरीरात असलेल्या ऊर्जेमुळेच आपण सगळे एकच आहोत, अशी भावना आपल्या संतांनी मांडली. अशा या ऊर्जेची आराधना या नवरात्रोत्सवात प्रत्येक जण त्याच्या धारणेनुसार करत असतो. शारीरिक आणि आध्यात्मिक शक्तीची ही ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आहार, व्यायाम, योग आणि प्राणायाम या सगळ्यांची योग्य सांगड घालावी लागते. या नवरात्रोत्सवात या हिरण्यगर्भ ऊर्जेची ओळख आणि तिचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास एक पाऊल निश्चितच सर्वांगीण विकासाकडे असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT