Horoscope Astrology सकाळ
संस्कृती

या राशीच्या लोकांवर कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही, असतात स्वतःच्या मर्जीचे मालक

या राशीचे लोक स्वतःशिवाय इतर कोणाचेही ऐकत नाहीत. ते त्यांच्या इच्छेनुसार वागतात.

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्त्रातील १२ राशींचा स्वतःचा स्वभाव असतो जो त्या राशीच्या लोकांमध्ये दिसून येतो. काही लोक स्वभावाने खूप साधे असतात, ते तुमचे बोलणे ऐकून लगेच समजतात पण काही लोकांचा या विपरीतही असतो. काही लोक तुम्हाला ऐकूण घेतील, पण जिथे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करायचे असतील, तिथे ते करणार. ते स्वत:च्या इच्छेचे मालक आहे.

आज आम्ही अशाच काही राशींबद्दल सांगणार आहोत, जे स्वतःशिवाय इतर कोणाचेही ऐकत नाहीत, म्हणजेच त्यांच्या इच्छेनुसार वागतात. (these zodiac sign do what they want they never listen to anybody)

मेष

मेष राशीच्या लोकांना प्रभावित करून तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता असे तुम्हाला वाटत असेल, तर हा तुमचा चुकीचा समज आहे. स्वभावाने सरळ समजले जाणारे या राशीचे लोक स्वतःचा मार्ग स्वत:च निवडतात आणि कोणाचेही ऐकत नाहीत. ते स्वतःच्या स्व:इच्छेचे मालक असतात. या मेष राशीच्या लोकांची फसवणूक करून कोणीही आपला मुद्दा मांडू शकत नाही.

मिथुन

असे म्हणतात की मिथुन राशीच्या लोकांच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच कळू शकत नाही. या राशीचे लोक कोणाच्याही बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. ते स्वत:च्या मनाचे ऐकूनच काम करतात. असे मानले जाते की या राशीचे लोक त्यांच्या निर्णयांबाबत खूप कडक असतात आणि कोणीही त्यांचे निर्णय बदलू शकत नाही. एकदा निर्णय घेतला की मग ते स्वतःचेही ऐकत नाहीत.

तूळ

तूळ राशीच्या लोकांचा स्वभाव अगदी साधा असतो, ते बाहेरून अतिशय सौम्य आणि साधे दिसतात पण आतून या राशीचे लोक त्यांच्या बोलण्याबाबत खूप निश्चयी असतात म्हणजेच कोणीही त्यांचे निर्णय बदलू शकत नाही. ते स्वतःशिवाय इतर कोणालाही फारसे महत्त्व देत नाही.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की या राशीच्या लोकांचे मन कोणीही जाणू शकत नाही. या राशीचे लोक गोष्टी लपवण्यात पटाईत असतात. या राशीच्या लोकांना मुर्ख बनवून कोणीही त्यांची फसवणूक करु शकत नाही. म्हणून ते आपल्या मनाप्रमाणे वागतात.

धनू
या राशीचे लोक स्वभावाने खूप प्रामाणिक मानले जातात आणि लालच देऊनही त्यांना कोणीही आपल्या पक्षात करू शकत नाही. या राशीच्या लोकांना स्वतःशिवाय इतर कोणाचेही नियंत्रण आवडत नाही. धनू राशीचे लोक तुमचे नक्कीच ऐकतील, पण तुमचे म्हणणे पूर्णपणे मान्य करतील हे विसरून जा. त्यांना फक्त स्वतःच्या इच्छेने काम करायला आवडते.

मकर
या राशीच्या लोक स्वत:च्या इच्छेचा मालक असतात. या राशीच्या लोकांना त्यांच्याबद्दल कोणी काय विचार करत आहे, याची पर्वा नसते. ते त्यांचे निर्णय स्वतःच घेतात. ते इतरांना काय म्हणायचे आहे ते खूप काळजीपूर्वक ऐकतात, परंतु शेवटी ते स्वतःच्या मनाचेच करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी! कॅबिनेट बैठकीत निर्णय; निवडणुकीबाबतही मोठं पाऊल

Sahyadri Trekkers : सह्याद्रीतील लिंगाणा सुळक्यावर ३२ जणांची साहसपूर्ण चढाई; आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

Mohol News : मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहोळच्या तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे सन्मानित; शहर विकासासाठी निधीची ग्वाही!

Navi Mumbai: नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT