Tulsi Vivah Muhurta 2022 esakal
संस्कृती

Tulsi Vivah Muhurta 2022 : तुळशी विवाह तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीला तुळशी विवाह केला जातो. त्यानंतरच लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. जाणून घ्या तुळशी विवाहाची तारीख, मुहूर्त.

सकाळ डिजिटल टीम

Tulsi Vivah Muhurta 2022 : हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व आहे. तुळशीची पानं प्रत्येक शुभ कार्यात वापरले जातात. हिंदू धर्मात कार्तिक महिन्यात तुळशी पूजनाला विशेष महत्व आहे. पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या एकादशीला तुळशी विवाह केला जातो.

तुळशी विवाह २०२२ तारीख

यंदा तुळशी विवाह शनिवारी ५ नोव्हेंबर २०२२ ला आहे. असे मानले जाते की, चार महिन्यांच्या मोठ्या निद्रेतून या दिवशी भगवान विष्णूला उठवलं जातं. यासोबतच सर्व शुभ मुहूर्तांची सुरूवात होते. या दिवशी कृष्णाचं तुळशीसोबत लग्न लावण्याची परंपरा आहे. या विवाहासोबत सर्व शुभ आणि धार्मिक कार्य सुरू होतं.

मुहूर्त

  • तुळशी विवाह - ५ नोव्हेंबर २०२२, शनिवार

  • कार्तिक द्वादशी तिथीरंभ - ५ नोव्हेंबर २०२२, सायंकाळी ६ वाजून ८ मीनिटं

  • द्वादशी तिथी समाप्त - ६ नोव्हेंबर २०२२ साय़ंकाळ ५ वाजून ६ मीनिटं.

  • तुळशी विवाह पारण मुहूर्त - ६ नोव्हेंबर दुपारी १ वाजून ९ मीनिटं ५६ सेकंद ते ३ वाजून १८ मीनिटं ४९ सेकंद.

तुळशी विवाहाचं महत्व

असं मानलं जातं की, तुळशी विवाह पूजा केली तर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

Covid-19: अमेरिकेत अचानक कोरोनाचा उद्रेक, नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; भारताला किती धोका?

Pakistani Spy Case: 'ई-रिक्षावाली' निघाली पाकिस्तानी हेर! मीरा ठाकूरचा मुंबई पोलीसशी काय संबंध? वाचा पूर्ण प्रकरण

Latest Marathi News Live Update : अमरावतीत बच्चू कडू पुन्हा आक्रमक; रक्तदानातून शेतकरी आंदोलनाला सुरुवात

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT