संस्कृती

Vastu Tips : ‘घड्याळ’अशा पद्धतीने घातलं तर बदलेल नशीब

वास्तुशास्त्रात हातात घड्याळ घालण्याच्या खास पद्धती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नशीब सतत तुम्हाला धोका देत आहे का? एखादे काम होईल असा विश्वास असलेले कामही होत नाही. लोकांचे मन लगेच पालटते त्यामुळे काम अपूर्ण राहते. असे तूमच्या बाबतीतही घडत असेल तर नक्कीच काहीतरी चुकत आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक घटनांवर वास्तूशास्त्राशी संबंधित गोष्टींचा प्रभाव असतो.

वास्तुशास्त्रात हातात घड्याळ घालण्याच्या खास पद्धती सांगितल्या आहेत. घड्याळाचे डायलचा आकार, पट्ट्याचे डिझाइन-रंग, यासाठी वास्तुशास्त्रात प्रभावी टिप्स देण्यात आल्या आहेत. जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या टीप्स तूम्हाला नक्की उपयोगी पडतील.

घड्याळ दोन्ही हातात घालता येते. पण शक्य असेल तर घड्याळ फक्त उजव्या हातात घालावे.फॅशन म्हणून मोठे डायल असलेले घड्याळ घालू नका.असे केल्याने तुमच्या करिअरमध्ये अनेक समस्या किंवा अडथळे येऊ शकतात. तसेच,अगदी लहान डायल असलेले घड्याळही घालू नका. रेग्युलर साईज असलेले घड्याळ घालणे शुभ असते.याशिवाय डायलचा आकार गोल किंवा चौकोनी असणे शुभ असते. त्यामुळे इतर आकारांचे डायल असलेले घड्याळ घालू नका.

घड्याळाचा पट्टा योग्य असावा. खूप सैल पट्टा तूमच्या एकाग्रतेत बाधा आणू शकतो. त्यामुळे पट्टा मनगटावर व्यवस्थित बसेल असे घड्याळ घाला.मनगटावरील घड्याळ किंवा हातातील घड्याळासाठी गोल्ड किंवा सिल्वर कलरचे घड्याळ सर्वात शुभ मानले जाते. महत्त्वाच्या कामाच्या, मुलाखतीच्या दिवशी गोल्डन घड्याळ घालणे शुभ ठरेल.मनगटावर घड्याळ उशीखाली ठेवून कधीही झोपू नका. यामुळे निद्रानाश आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT