PM Narendra Modi Rajya Sabha Speech esakal
देश

Narendra Modi : गांधी घराण्यावर टीका करत PM मोदींनी सांगितल्या 'या' 10 मोठ्या गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत (Rajyasabha) विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.

सकाळ डिजिटल टीम

विश्वास ही मोठी शक्ती आहे, आम्ही लोकांचा विश्वास जिंकला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत (Rajyasabha) विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.

यावेळी मोदींनी गांधी कुटुंबीयांवर नवा हल्ला चढवत, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर त्यांच्यापैकी कोणीही ‘नेहरू’ हे नाव का वापरलं नाही, असा सवाल केला.

आपण कुठंही नेहरूंचा उल्लेख चुकवला तर ते (काँग्रेस) नाराज होतात. नेहरू इतके महान व्यक्ती होते, मग त्यांच्यापैकी कोणीही नेहरू आडनाव का वापरत नाही. नेहरू नाव वापरण्यात लाज कशाची आहे, असा सवालही मोदींनी केला.

  • पीएम मोदी म्हणाले, आजही देशातील 600 हून अधिक योजना गांधी आणि नेहरू कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत. तुम्ही आम्हाला प्रश्न करता, पण नेहरू आडनाव स्वतः ठेवायला लाज वाटते का?

  • मल्लिकार्जुन खर्गे तक्रार करतात की, मोदीजी वारंवार त्यांच्या मतदारसंघात येतात. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी तक्रार करण्यापूर्वी आम्ही किमान एक कोटी 70 लाख बँक खाती उघडली, त्यापैकी 8 लाखांहून अधिक जनधन खाती उघडली आहेत. आता जनतेनं काँग्रेसचं खातंच बंद केलंय, असा टोमण्णा मोदींनी लगावला.

  • राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं, 'ते गरीबी हटाओ म्हणायचे, पण 4 दशकांहून अधिक काळ काहीही केलं नाही. देशातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत.

  • राज्यसभेत गदारोळ आणि घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी खासदारांची मोदींनी चांगलीच खरडपट्टी केली. मी देशासाठी जगतो, देशासाठी काहीतरी करण्यासाठी बाहेर पडलो आहे, पण तुम्ही काय केलं? असा सवाल त्यांनी केला.

  • सैन्यात मुलींच्या वाढत्या सहभागावर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत मातेच्या रक्षणासाठी माझ्या देशाच्या मुली सियाचीनमध्ये तैनात होताहेत, हे पाहून मला अभिमान वाटतोय. आज देशात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढत आहे.

  • विरोधकांवर निशाणा साधत मोदी म्हणाले, 'जेवढी चिखलफेक कराल, तेवढी कमळं फुलतील.' सभागृहात जे घडतंय ते देश गांभीर्यानं पाहतोय, त्यामुळं गदारोळ बंद करा.

  • हा देश कोणत्याही कुटुंबाची जहांगिरी नाही. पिढ्यानपिढ्या माणसांनी बनलेला हा देश आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावावर आम्ही खेलरत्न असं नाव दिलं. आम्हाला त्याचा अभिमान आहे. जे आपल्या देशाच्या सैन्याला अपमानित करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तिथं 21 बेटांना परमवीर चक्र मिळालेल्या वीरांचं नाव दिलं.

  • युनिकॉर्नच्या जगात आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आज भारत डिजिटल युगात सर्वांवर भारी पडतोय. एक काळ होता, जेव्हा आपण मोबाईल आयात करायचो, आज माझा देश मोबाईल निर्यात करतोय. प्रत्येक तंत्रज्ञानाचा देश अतिशय वेगानं अवलंब करत आहे.

  • पंतप्रधान म्हणाले, माझ्या देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनासाठी अशी लस बनवली, जी जगभरात स्वीकारली गेली आणि 150 देशांना त्याचा फायदा झाला.

  • विश्वास ही मोठी शक्ती आहे, आम्ही लोकांचा विश्वास जिंकला आहे. कष्ट करावं लागले, पण दुर्गम गावांना आशेचा किरण दिसला पाहिजे. पूर्वीच्या सरकारच्या काळात वीज काही तासांसाठी यायची. आज 22 तास वीज देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT