पंतप्रधान मोदी sakal
देश

नव वर्षात कोरोना भारताच्या विकासात अडथळा आणू शकणार नाही - मोदी

आम्हाला विकासाचा वेग आणखी वाढवायचा असून, कोरोनामुळे आव्हाने उभी आहेत.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरोधात देश सावधगिरीने आणि सतर्कतेने सामना करेल, त्यामुळे नवीन वर्षात कोरोना महामारी भारताच्या विकासात अडथळा आणू शकणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शनिवारी व्यक्त केला. पीएम किसान सन्मान निधीचा (PM-KISAN scheme) 10 व्या हप्ता आज मोदींच्या हस्ते जारी करण्या आला, त्यावेळी ते बोलत होते. 2021 हे वर्ष भारताच्या कोविड-19 विरुद्धच्या भक्कम लढ्यासाठी स्मरणात राहील असे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले. (2021 will be remembered for India's strong fight against the Covid-19)

गेल्या वर्षभरात भारताने विविध क्षेत्रातील सुधारणांचा वेग वाढवला आणि आधुनिक पायाभूत सुविधाही निर्माण केल्या, असे ते म्हणाले. "आम्हाला विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. कोरोनामुळे आव्हाने उभी आहेत, पण त्यामुळे विकासाची प्रक्रिया थांबू शकत नाही," असे मोदी यावेळी म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था 8 टक्क्यांहून अधिक आहे. यावेळी त्यांनी 145 कोटींहून अधिक कोरोना लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान (PM-KISAN scheme) निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या (Farmer) बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. पीएम किसान सन्मान निधीच्या (10th Installment Under PM-KISAN Scheme) दहाव्या हप्त्यात सरकारने दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले यावेळी नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, विविध राज्यांचे मंत्री आणि कृषी संस्थांचे प्रतिनिधींनी या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम राहणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT