4 die as bus carrying Vaish nodevi pilgrims catch fire near jammu and kashmir  
देश

जम्मू काश्मीर : यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला आग, 4 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वैष्णोदेवीकडे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला शुक्रवारी आग लागल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला भीषण प्रकार समोर आला. तर 22 जण जखमी झाले आहेत. कटराहून जम्मूला जाणाऱ्या लोकल बसला कटरापासून दीड किमी अंतरावर खरमलजवळ आग लागली.

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालत्या बसला भीषण आग लागली. या आगीत 4 प्रवासी जिवंत जळाले असून 22 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. बस कटराहून जम्मूकडे येत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या इंजिनला आग लागली जी काही वेळातच पसरली आणि सर्व प्रवाशांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

चालत्या बसला भीषण आग

एडीजीपी जम्मू यांनी ट्विट करून अपघाताची माहिती दिली. कटरा ते जम्मूच्या मार्गावर एक स्थानिक बस क्रमांक JK14/1831 कटरा येथून सुमारे 1 किमीवर पोहोचली होती तेव्हा तिला आग लागली. आग लागण्याच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. एफएसएल टीम घटनास्थळी तैनात आहे. 22 जखमींना उपचारासाठी कटरा येथे नेण्यात आले आहे.

बस इतक्या वेगाने पसरली की प्रवाशांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कसेबसे सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात यश आले. असे असतानाही चार प्रवासी दगावले. लोकांनी सांगितले की, बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT