Haryana Expressway Bus fire Killed 8 Traveleres Esakal
देश

Watch Video: एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Haryana Bus Fire: या अपघातातील घक्कादायक गोष्ट म्हणजे, बसमध्ये महिला आणि मुलांसह एकाच कुटुंबातील 60 हून अधिक लोक होते, ते सर्व पंजाबचे रहिवासी होते.

आशुतोष मसगौंडे

हरियाणाच्या तावडू उपविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या कुंडली मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर शुक्रवारी-शनिवारी रात्री भाविकांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली.

यामध्ये बसमधून प्रवास करणारे आठ जण जिवंत जळाले, तर दोन डझनहून अधिक जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालत्या बसमध्ये आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.

अपघातात बळी पडलेले पंजाब आणि चंदीगडचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून ते मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन परतत होते. याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या अपघातातील घक्कादायक गोष्ट म्हणजे, बसमध्ये महिला आणि मुलांसह एकाच कुटुंबातील 60 हून अधिक लोक होते, ते सर्व पंजाबचे रहिवासी होते.

शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास बसच्या मागच्या बाजूला धुराचा वास आल्याचे वाचलेल्यांनी सांगितले.

एका मोटारसायकलस्वाराला बसच्या मागील बाजूस आग लागल्याचे दिसले आणि त्याने बसचा पाठलाग केला. शेवटी त्याने बस थांबवली आणि चालकाला सतर्क केले.

कशामुळे लागली आग?

दरम्यान या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमध्ये ठेवलेले सामान आणि सीट कव्हर जळून खाक झाले होते. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती कळवली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची चौकशी केली जाईल. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT