viral सकाळ
देश

बायकोसोबतच्या भांडणाला कंटाळून नवऱ्याने ताडाच्या झाडावर ठोकला मुक्काम

पत्नी त्याच्याशी सतत भांडायची, शिव्या द्यायची एवढंच काय तर त्याला मारायची, त्यामुळे त्याने असा झाडावर आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळ डिजिटल टीम

नवरा बायको म्हटले की रुसवे फुगवे आले. अनेकदा नवरा बायकोची भांडणे चर्चेचा विषयही ठरतात. सध्या असंच एक प्रकरण उघडकीस आलंय. बायकोच्या सततच्या भांडणाला कंटाळून नवऱ्याने असं काही केलं की तुम्हीही वाचून अवाक् व्हाल. होय, नवऱ्याने बायकोच्या भांडणाला कंटाळून ताडाच्या झाडावर मुक्काम ठोकलाय.

हे प्रकरण उत्तरप्रदेश येथील असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपण हे बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून केल्याचे तो म्हणतो.

उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यात राहणाऱ्या राम प्रवेश यांचे सतत त्यांच्या पत्नीशी भांडण व्हायचे. या भांडणातून सुटका म्हणून तसेच भांडणांपासून कंटाळून त्यांनी चक्क झाडावर राहण्याचा निर्णय घेतला. तो गावात असणाऱ्या ताडाच्या झाडावर राहतो.

राम प्रवेश म्हणतो, "जोपर्यंत पत्नी स्वत: येत आपल्या कृत्याप्रती माफी मागत नाही तसेच वडीलधारी माणसे या भांडणांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत मी या झाडावरच राहणार."

राम प्रवेश यांच्या वडिलांना दावा केला आहे की त्याची पत्नी त्याच्याशी सतत भांडायची, शिव्या द्यायची एवढंच काय तर त्याला मारायची, त्यामुळे त्याने असा झाडावर आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय गावातील लोक मात्र त्याच्या झाडावर असलेल्या आश्रयामुळे नाराज आहे. त्यांच्यामते हे ताडाचे झाड उंच असल्याने त्याला गावातील कुणाच्या घरी काय सुरू आहे, हे सर्व दिसतं जे खुप चुकीचं आहे. गावकरी राम प्रवेशला खाली उतरण्यासाठी त्याच्याजवळ जातात मात्र तो त्यांना झाडावरुन काहीही फेकून मारतो.

सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर नेटकरी यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT