Crime News sakal
देश

धक्कादायक! पैसे देण्यास नकार दिल्याने आईवडिलांच्या डोक्यात घातले सिलेंडर

अनेकदा आरोपीने आई वडिलांसह संपूर्ण कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने एका मुलाने आपल्या आईवडिलांना गॅस सिलेंडरने मारहाण करून त्यांची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. अजय साहनी असे आरोपीचे नाव आहे. (A man killed his parents as they refused to give money to him)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटाही गावात राहणाऱ्या अजय साहनी याने काल रात्री झोपलेले वडील शंभू साहनी आणि आई शारदा देवी या दोघांचीही डोक्यात लहान गॅस सिलेंडरने वार करून त्यांना ठार केले. हि घटना त्याच्या लहान भावाच्या पत्नीने पाहिले. आपल्याला कुणीतरी बघत आहे, हे लक्षात येताच आरोपी अजय तिलाही मारण्याकरीता धावला मात्र तीने घटनास्थळावरुन पळून आपला जीव वाचवला.

आरोपी अजय फेब्रुवारी महिन्यात दिल्लीहून गावात आला होता. अजय हा नेहमी त्याचा आईवडिलांशी भांडायचा तसेच सतत पैशाची मागणी करायचा. अनेकदा त्याने आई वडिलांसह कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र आई वडिल नेहमी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. याच रागातून त्याने ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT