Viral Video सकाळ डिजिटल टीम
देश

गांजाचा झुरका घेणाऱ्या मुलाला आईने दिली मिरचीची धूरी

तेलंगणामध्ये अलीकडच्या काळात तरुण वयोगटात अमली पदार्थांचे सेवन वाढले.

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात मुलाच्या गांजाच्या व्यसनामुळे चिंतेत असलेल्या आईने आपल्या १५ वर्षांच्या मुलाला खांबाला बांधून त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर लावल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.आईने त्याला बेदम मारहाण केली असून शिक्षा म्हणून त्याच्या चेहऱ्यावर मिरचीपूड टाकली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. (A mother applied chilli powder on her son’s face as boy had been addicted to ganja)

१५ वर्षांच्या मुलाला गांजाचे इतके व्यसन होते.त्याच्या या व्यसनाने आई चिंतेत असायची मात्र एकदिवस आईचा राग अनावर गेला. त्यामुळे आईने त्याच्या चेहऱ्यावर मिरचीपूड टाकत बेदम मारले.जेव्हा त्याने आपल्या आईला व्यसन सोडण्याचे वचन दिले, तेव्हाच या मुलाची सुटका झाली.

सुरुवातीला तिने तिच्या मुलाला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगा आपले ऐकत नसल्याने तिने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. तिने तिच्या मुलाला विजेच्या खांबाला बांधले आणि त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर शिंपडली जेणेकरून तो अंमली पदार्थांचे सेवन थांबवेल.अखेर मुलाने आईला व्यसन सोडण्याचे वचन दिले

अलीकडच्या काळात तरुणांमध्ये तेलंगणामध्ये अमली पदार्थांचे सेवन हे एक मोठे आव्हान आहे या संदर्भात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना राज्यातील ड्रग पेडलिंग आणि ड्रग्सच्या सेवनावर कारवाई करण्यास आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT