देश

तुमचे बुरे दिन लवकरच येतील; संतापलेल्या जया बच्चन यांचा केंद्राला शाप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘तुमचे बुरे दिन लवकरच येतील असा शाप मी तुम्हाला देते.’ अशा शब्दांत समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) खासदार जया बच्चन (Jaya Bachchan Outburst In Rajya Sabha) यांनी आज राज्यसभेत आपला संताप व्यक्त केला. त्यांच्या या संतापामुळे दुपारी सभागृहातील वातावरण प्रचंड तापले होते. बच्चन यांनी ‘गाढवापुढे वाचली गीता’ या मराठी म्हणीची हिंदी आवृत्ती सांगताना, ‘म्हैस’ असा शब्द थेट न वापरता, ‘तुम्ही कसल्या लोकांसमोर पुंगी वाजवत आहात.’ असा सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांना केला. सरकारने काही खासदारांचे निलंबन माघारी घेण्याबाबत केवळ पाचच पक्षांना चर्चेसाठी बोलाविल्याने विरोधकांनी या संपूर्ण बैठकीवर बहिष्कार टाकला होता. (Rajya Sabha) आज सून ऐश्वर्या बच्चनला पनामा पेपर्स प्रकरणी चौकशीसाठी बोलावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा संसदेतील हा संताप सध्या चर्चेचं कारण ठरला आहे.

बच्चन यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यानंतर काही वेळातच पीठासीन अधिकारी विरोधी पक्षीयांचा आवाज बंद करतात, अशा प्रकारचा गंभीर आरोप केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. बारा खासदारांचे निलंबन रद्द करण्याच्या व गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना हाकलण्याच्या मागणीसाठी विरोधकांना आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र संसद अधिवेशन चालू असेपर्यंत तरी मिश्रा यांचा राजीनामा घेण्यास सरकार पक्षाची तयारी दिसत नाही.

राकेश सिन्हांची टिप्पणी

अमली पदार्थ नियंत्रण विधेयकावरील चर्चेदरम्यान जया बच्चन बोलत असतानाच भाजपचे राकेश सिन्हा यांनी त्यांच्या काही वक्तव्यावर आक्षेप घेतले व बच्चन यांच्यावर व्यक्तिगत टिप्पणी केली. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. बच्चन यांचाही पारा चढला. पीठासीन अधिकारी भुवनेश्वर कलिता यांनी बच्चन यांना तुम्ही फक्त विधेयकावरच बोला, असे सांगितल्याने बच्चन आणखी भडकल्या. त्यावेळी काही भाजप सदस्य हसताना पाहून त्या म्हणाल्या की, ‘‘तुम्ही एका महिला सदस्यावर व्यक्तिगत टिप्पणी केली आहे. मी तुम्हाला शाप देते की तुमचे बुरे दिन लवकरच येतील.’’ यानंतर भाजप सदस्य खवळले.

‘फूट पाडा, राज्य करा’ हेच सरकारचे धोरण

संसदेतील बारा खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव देतानाही ‘फूट पाडा, राज्य करा’ हे धोरण केंद्र सरकारने अवलंबिले असल्याचा आरोप करून कॉंग्रेससह विरोधकांनी सरकारने बोलाविलेल्या बैठकीवर पूर्ण बहिष्कार घातला. त्यावर ज्या पक्षांचे खासदार निलंबित झाले त्यांच्याच पक्ष नेत्यांना बैठकीला बोलावणे संयुक्तिक आहे व तेच संसदीय परंपरेला धरून आहे, असा युक्तिवाद सरकारने केला. कामकाजात अडथळे आणणे व संसदेची कारवाई बंद पाडणे हेच विरोधकांचे एकमेव धोरण आहे असा आरोप राज्यसभा सभागृह नेते पीयूष गोयल यांनी केला. बैठकीत विरोधी पक्षनेते एक बोलतात व बाहेर वाहिन्यांचे कॅमेरे समोर आले की उलटेच बोलतात असे सांगून ते म्हणाले की, ‘‘ गोंधळ घालणाऱ्यांनी सभागृहाचा, अध्यक्षांचा व देशाचा अपमान केला आहे. राज्यसभेत अनेकदा निलंबनच्या घटना झाल्या आहेत. सभागृहात गोंधळाबद्दल माफी मागण्यात काहीही कमीपणा नाही. मात्र कॉंग्रेसचे वर्तन केवळ बेजबाबदारपणाचे आहे.’’

आनंद शर्मांना उत्तर

कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी ११ वर्षांपूर्वी राज्यसभेत ७ खासदारांना निलंबित करण्यात आले होते त्यावेळचे उदाहरण दिले त्याबद्दल गोयल म्हणाले की, ‘‘ त्या सदस्यांमध्ये भाजपचा एकही खासदार नव्हता. मात्र तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत अरुण जेटली यांनी विरोधी नेत्यांशी संवाद साधला व गोंधळाबद्दल स्वतः दोनदा सभागृहात खेद व्यक्त केला. तत्कालीन अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी आधी ४, नंतर १-१ अशा ६ जणांचे निलंबन मागे घेतले. एका सदस्याने अखेरपर्यंत माफी मागितली नव्हती त्यांचे निलंबन कायम राहिले होते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Latest Marathi News Live Update: शिवाजी पार्कमध्ये मोदींचे कटआऊट हटवले, भाजप कार्यकर्ते संतप्त

SCROLL FOR NEXT