esakal

देश

Contaminated milk tragedy: भेसळयुक्त दुधामुळे ४८ तासांत किडनी निकामी होऊन चौघांचा मृत्यू ; १२ जण रूग्णालयात दाखल

Contaminated Milk : दूध विक्रेत्यास पोलिसांनी घेतलं ताब्यात ; जाणून घ्या, नेमकी कुठं घडली घटना?

Mayur Ratnaparkhe

Milk Contamination Incident : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुंद्री भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या ४८ तासांत किडनीशी संबंधित आजाराने चार जणांचा मृत्यू झाला आहे. इतर बारा जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्याचेही समोर आले आहे..

या प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तपासात असे दिसून आले आहे की पीडितांनी भेसळयुक्त दूध प्यायले होते यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि चौघांचा मृत्यू झाला. तर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी कोरुकोंडा विभागातील नरसापुरम गावातील एका दूध विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे बेकायदेशीर डेअरी युनिट देखील जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या विशिष्ट विक्रेत्याकडून दूध घेणाऱ्या १०५ कुटुंबांपैकी ७५ कुटुंबांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. संशयित आजाराचे कारण निश्चित करण्यासाठी चाचणी सुरू आहे.

परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वैद्यकीय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी विजयवाडा येथील विशेष पथके राजमुंद्री येथे दाखल झाली आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन आढावा बैठक घेतली आणि बाधित लोकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT