Amit Shaha
Amit Shaha Amit Shaha
देश

‘...तर तिन्ही भागात सीआरपीएफला तैनात करण्याची गरज भासणार नाही’

सकाळ डिजिटल टीम

मध्य भारतातील नक्षलग्रस्त प्रदेश असो, काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद असो किंवा ईशान्येकडील बंडखोर शक्ती असो, अशा गटांना नष्ट करण्यात आणि तिन्ही प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात सीआरपीएफने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढील काही वर्षांत तिन्ही भागात सीआरपीएफला पुन्हा तैनात करण्याची गरज भासणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) म्हणाले.

अमित शहा हे शनिवारी (ता. १९) मौलाना आझाद स्टेडियमवर सीआरपीएफच्या (CRPF) ८३ व्या स्थापना दिनानिमित्त (83rd founding day) आयोजित सभेत बोलत होते. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद, नक्षलवाद आणि ईशान्येतील बंडखोर शक्तींविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल कौतुक केले. दिल्ली-एनसीआरमध्ये सीआरपीएफच्या मुख्यालयाबाहेर परेड आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सीआरपीएफ हे केवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल नाही तर देशातील प्रत्येक मुलाला त्याच्या शौर्य आणि धैर्यासाठी आवडते. देशात कुठेही दंगल झाली की सीआरपीएफच्या (CRPF) तैनातीमुळे लोकांना समाधान मिळते. देशाच्या सर्वांत मोठ्या निमलष्करी दल सीआरपीएफला जे प्रेम आणि आदर मिळाला आहे ते त्यांच्या जवानांच्या त्याग आणि समर्पणामुळे आहे, असेही अमित शहा (Amit Shah) म्हणाले.

देशविरोधी शक्तींविरुद्ध लढा

१९९० च्या दशकात एक काळ होता जेव्हा ईशान्येकडील दहशतवाद आणि काश्मीरमध्ये (jammu kashmir) पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद शिगेला पोहोचला होता आणि देशातील प्रत्येकजण चिंतेत होता. दोन दशकांत सीआरपीफ ने समर्पण आणि दृढनिश्चयाने देशविरोधी शक्तींविरुद्ध लढा दिला, जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असेही शहा (Amit Shah) म्हणाले.

रोडमॅप तयार करा

सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांना दलाचे आधुनिकीकरण करून आणि अद्ययावत उपकरणे खरेदी करून आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी रोडमॅप तयार करण्यास सांगतो. सीआरपीएफला आधुनिक, सक्षम आणि प्रभावी दल बनवावे लागेल, असेही अमित शहा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT