Asaduddin Owaisi

 
sakal
देश

Asaduddin Owaisi Statement : ''भारतात मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त होणार नाही'' ; ओवेसींचं मोठं विधान!

जाणून घ्या, पंतप्रधान मोदींच्या भाषणावर ओवेसींनी नेमकी काय टिप्पणी केली आहे?

Mayur Ratnaparkhe

Owaisi Statement on Muslim Population India : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, भारतातील मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त होणार नाही. तेलंगणातील नगरपालिका निवडणुकीपूर्वी शुक्रवारी रात्री निजामाबादमध्ये एका रॅलीला संबोधित करताना हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी हे विधान केले.

ओवेसी म्हणाले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेतील अलीकडील भाषण ऐकत होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की जगातील लोकसंख्या वृद्ध होत आहे तर भारताची लोकसंख्या तरुण आहे. यानंतर मग ओवेसी यांनी प्रश्न केला की, "जर पंतप्रधानांना विचारले गेले की देशाच्या लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक ४० वर्षांपेक्षा कमी आहेत,  तर त्यांनी त्यांना रोजगार देण्यासाठी कोणते उपाय केले आहेत आणि त्यांनी त्यांना कोणते कौशल्य शिकवले आहे?"

ओवेसी म्हणाले, "२० वर्षांत ही तरुण लोकसंख्या वृद्ध होईल. महागाई किती वाढेल आणि त्यांना किती खर्च करावा लागेल याचा आपण विचारही करत नाही. उलट, ते म्हणतात की मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. मुस्लिम लोकसंख्या स्थिर होईल. भारतातील मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त होणार नाही."

ओवेसी म्हणाले, "आता त्यांना समजले आहे की २५-३० वर्षांत देशाची लोकसंख्या वृद्ध होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत म्हणतात की किमान तीन मुले जन्माला घालावीत. खरंतर ते स्वतः तसे करत नाही, ही वेगळी बाब आहे."

याचबरोबर ओवेसी म्हणाले की, "पूर्वी असे म्हटले जात होते की लोकसंख्या नियंत्रणासाठी विधेयक आणले जाईल आणि ते मुस्लिमांवर टीका करायचे. आता त्यांना कळले आहे की देशाची लोकसंख्या वृद्ध झाल्यावर त्याचा देशावर काय परिणाम होईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT