UP Team eSakal
देश

UP मध्ये नवा ट्विस्ट; भाजपला सोडचिठ्ठी दिलेले मौर्य 'सपा'मध्येही जाणार नाही?

उत्तर प्रदेशमध्ये अन्य काही आमदारही भाजप सोडण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी मंगळवारी योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत भाजप सोडण्याची घोषणा केली. यूपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला मानला जातोय. मात्र आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. मौर्य यांनी मंत्रायलातून राजीनामा दिला मात्र, पण आता पुढे काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पक्षात प्रवेश करणार का? याबद्दलच आता साशंकता निर्माण झाली आहे.

अखिलेश यादव यांच्यासोबतचा मोर्य यांचा फोटो हे सूचित करतो की, ते समाजवादी पक्षात प्रवेश करतील, मात्र त्यांच्या मुलीने ही गोष्ट नकारली आहे. तर मौर्य यांनीही स्वत: सपामध्ये सामील होण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही. दुसरीकडे भाजपकडून मौर्य यांचं मन वळवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं याबद्दल कोणतीही शक्यता वर्तवणं कठीण झालं आहे. मौर्य यांनी हा राजीनामा दिला, यामागे पक्ष श्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू असल्याचं देखील बोललं जातंय.

दरम्यान, भाजप सोडलेल्या मौर्य आणि त्यांच्याशी संबंधित आमदारांकडून सध्या वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. भाजपला सोडचिठ्ठी दिलेले बांदा येथील तिंदवारी मतदारसंघाचे आमदार ब्रजेश प्रजापती यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, स्वामी प्रसाद मौर्य हे आमचे नेते असून, 14 तारखेच्या बैठकीनंतर कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय झालेला नसून, स्वामी प्रसाद मौर्य ज्या पक्षात जातील, त्या पक्षात आपण सर्व एकत्र जाऊ असं त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT