AIMIM chief Asaduddin Owaisi criticizes Yogi government esakal
देश

Atiq Ahmad Murder : अतिक-अश्रफच्या हत्येनंतर ओवैसींचा संताप; म्हणाले, तुम्ही गिधाडं आहात, मृतदेह खा..

उत्तर प्रदेशातील अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांचाही दोन-तीन जणांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

याचा उत्तर प्रदेश सरकारशी काही संबंध नाही, तर मग ते कट्टर कसे झाले, त्यांच्याकडं इतकी शस्त्रं कुठून आली?

Atiq Ahmad Murder : उत्तर प्रदेशातील अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांचाही दोन-तीन जणांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या दोघांना मेडिकल टेस्टसाठी नेताना हा प्रकार घडला. या हत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील योगी सरकारवर (Yogi Government) संताप व्यक्त करत प्रश्न विचारलेत. ते म्हणाले, या हत्येला दहशतवादाचं नाव देणार नाही, तर काय मारेकऱ्यांना देशभक्त म्हणणार का, त्यांना हार घालणार का? असा सवाल त्यांनी केलाय.

याचा उत्तर प्रदेश सरकारशी काही संबंध नाही, तर मग ते कट्टर कसे झाले, त्यांच्याकडं इतकी शस्त्रं कुठून आली? एकाचवेळी गोळ्या झाडल्या जात असून त्यांना कुठंही अडवण्यात आलं नाही. ते मूलतत्त्ववादी आहेत आणि भाजप त्यांना संरक्षण देत आहे, असा आरोपही ओवैसींनी केलाय.

गोळ्या घालून धार्मिक घोषणा कशाला देता. त्यांना दहशतवादी नाही तर काय देशभक्त म्हणणार का? त्यांना फुलांचा हार घालणार का? असा सवाल करत ते म्हणाले, 'जे लोक टीव्ही स्टुडिओत बसून आनंदोत्सव साजरा करत होते, तुम्ही गिधाडं आहात. तिथं पडलेले मृतदेह खा. आज भाजपची सत्ता आहे, उद्या दुसरी कोणाची असेल, हे तुम्ही विसरत आहात. उद्या हाच तांडव मानवतेवर होणार आहे. अशामुळं लोकशाही यशस्वी होणार आहे का, संविधान मजबूत होईल का? असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

Pune News: चिखली-कुदळवाडीनंतर मोईतही प्रशासनाचा बुलडोझर; अवैध भंगार व्यवसायावर कारवाई, खेड तालुक्यात प्रशासनाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT