देश

... तर आम्ही वनरक्षकांच्या हाती शस्त्रे देऊ;अधिकाऱ्यांवरील हल्ल्याने सर्वोच्च न्यायालय संतापले 

पीटीआय

नवी दिल्ली - सशस्त्र गुन्हेगार आणि तस्करांकडून वनरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली तसेच त्यांना शस्त्रे, बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट देण्याची तयारी दर्शविली आहे. या वनरक्षकांचे संरक्षण होणे गरजेचे असून प्रसंगी त्यांना शस्त्रे देण्याचे आदेश आम्ही देऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. 

जंगलातून होणारी कोट्यवधी डॉलरच्या वनसंपदेची तस्करी रोखण्याचे काम हे वनअधिकारी करत असतात, चोरट्यांना रोखणारी ही सर्वांत मोठी यंत्रणा आहे. तसे पाहता या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी या यंत्रणेमध्ये सक्तवसुली संचालनालयास (ईडी) देखील सामावून घेतले जावे. यामध्ये वेगळा वन्यजीव विभाग असावा, तो या गुन्ह्यांना रोखण्याचे काम करेन, असे निरीक्षण देखील या खंडपीठाने नोंदविले. या खंडपीठामध्ये न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही रामसुब्रह्मण्यम यांचा देखील समावेश होता. टी.एन. गोदावर्मन थिरुमूलपाद यांनी यासंदर्भात २५ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने हे निर्देश दिले. 

वनरक्षकांकडे फक्त काठीच 
ज्येष्ठ विधिज्ञ श्‍याम दिवाण यांनी यावेळी न्यायालयास सांगितले की ‘‘ भारतामध्ये वनरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण हे ३८ टक्के एवढे आहे. मध्यंतरी राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील वनरक्षकांवर देखील हल्ले झाले होते. या हल्ल्यानंतर याच वनरक्षकांविरोधात खटले देखील दाखल होतात.’’ यावर न्यायालय म्हणाले, ‘‘ आसाममध्ये या वनरक्षकांना शस्त्रे दिली जातात महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांच्याकडे केवळ काठी असते. ’’ न्यायालयाने यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, दिवाण आणि विधिज्ञ ए.डी.एन. राव यांना वनरक्षकांचे संरक्षण कसे करायचे याबाबत निवेदन सादर करण्यास सांगितले तसेच तुमच्या म्हणण्यानंतर आम्ही आदेश देऊ असे न्यायालय म्हणाले. 

न्यायालय म्हणाले 
कर्नाटकमध्ये वनअधिकारी चप्पल घालून फिरतात 
तस्करच वनअधिकाऱ्यांना मारहाण करतात 
सरकारचे म्हणणे ऐकल्यानंतर आम्ही आदेश देऊ 
खटले दाखल झाल्याने वनअधिकाऱ्यांचे खच्चीकरण 
सशस्त्र तस्करांचा वनअधिकारी कसा सामना करणार? 
आणीबाणीत वनअधिकाऱ्यांना कोणाचीच मदत होत नाही 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT