Belgaum Crime News esakal
देश

Belgaum Crime : उप्पीटामध्ये विष घालून पतीच्या खुनाचा प्रयत्न; शेतजमीन हडपण्यासाठी पत्नीचं धक्कादायक कृत्य

शेतजमीन हडप करण्यासाठी निंगाप्पाचा खून करण्याचे ठरले.

सकाळ डिजिटल टीम

हेच उप्पीट कुत्रे आणि मांजराने खाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.

बेळगाव : गोरेबाळ (ता. सौंदत्ती) येथे उप्पीटमध्ये विष घालून पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार काल (ता. १८) उघडकीस आला. निंगाप्पा फकिराप्पा हमानी (वय ३५, गोरेबाळ) असे अत्यवस्थ झालेल्याचं नाव आहे.

तर, या प्रकरणात निंगाप्पाची पत्नी आणि तिच्या भावाविरूद्ध (निंगाप्पाचा मेहुणा) गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी, विषमिश्रित उप्पीट खाल्यामुळे निंगाप्पा ११ ऑगस्ट रोजी अत्यवस्थ झाले. त्यासाठी हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

निंगाप्पा याची पत्नी सावक्का व तिचा भाऊ फकिराप्पा लक्ष्मण सिंधूगीने मिळून हत्येचा कट रचला होता. निंगाप्पाच्या नावे गावात दोन एकर शेती आहे. शेतजमीन हडप करण्यासाठी निंगाप्पाचा खून करण्याचे ठरले. यासाठी उप्पीटमध्ये विष घालून त्याचा खून करण्याचे नियोजन होते. त्यानुसार ११ रोजी उप्पीटमध्ये विष घालून निंगाप्पाला खायाला दिले. पण, ते खाल्यामुळे अत्यवस्थ झाले.

वैद्यकीय उपचारासाठी हुबळीत दाखल केले आहे. त्याठिकाणी त्यांची प्रकृती अद्याप स्थिर नाही. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस चौकशीत मालमत्ता बहीण आणि भावाने मिळून कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुत्रे आणि मांजराचा मृत्यू

विषमिश्रित उप्पीटमुळे सौंदत्ती येथील निंगाप्पा हमानी अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे हेच उप्पीट कुत्रे आणि मांजराने खाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind Vs SA 2nd Test : भारतीय खेळाडूंची दाणादाण, गौतमच्या निर्णयांमुळे अवस्था 'गंभीर', चाहत्यांना आठवला ग्रेग चॅपलचा काळ

Kolhapur TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीचा भंडाफोड! गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश; माध्यमिक शिक्षकांवर संशय वाढला

Latest Marathi News Live Update : अयोध्येत राम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

Mumbai News: ‘घर-घर राम’ अभियान सुरू! घराघरात धर्मध्वज फडकवण्याचे भाजपचे आवाहन

Nagpur Kidnapping Case: स्कूल बसने गेला, पण परतलाच नाही; भावेशच्या आई-वडिलांचा आक्रोश, सावनेर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT