At Badrinath Dham Kailasamath Adhikar Swami Samvidanand Saraswati, Badri-Kedar Temple Committee CEO Yogendra Singh along with other officials. esakal
देश

Badrinath Dham : मंत्रोच्चाराच्या जयघोषात बद्रीनाथ धामचे कपाट बंद!

प्रतीक जोशी

नाशिक : पृथ्वीवरील वैकुंठ ज्याला भूवैकुंठ मानले जाते असे हिमालयसहित भारतातील चार धामपैकी एक बद्रीनाथ धाम. शनिवार (ता. १९) रोजी मंत्रोच्चाराच्या गजरात विधीवत पुजा- अर्चा करुन बद्रीनाथ धामचे कपाट (द्वार) भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले.

यावेळी आर्मी बँडच्या उद्घोषात मोठ्या उत्साह अन् जल्लोषात परंपरेनुसार दुपारी ३ वाजून ३५ मिनीटांनी कपाट बंद करण्यात आल्याची माहिती बद्रीनाथ धाम येथून नाशिक येथील कैलास मठ अधिपती स्वामी संविदानंद सरस्वती यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

(Badrinath Dham closets closed amid chanting desh news)

स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले, बद्रीनाथ हे भारतासह हिमालयातील चार धामपैकी एक धाम आहे. भगवान नर- नारायणाने येथे साठ हजार वर्षे तपश्चर्या केल्याची नोंद पुराणात आहे. भगवान नारायण ज्यावेळी येथे तपश्‍चर्या करत होते त्यावेळी प्रत्येक ऋतूत त्यांची अविरत सेवा करता यावी या हेतून देवी लक्ष्मीने येथे बोर वृक्षाचे रुप धारण केले. या वृक्षाला संस्कृत मध्ये ‘बद्री’ असे म्हणतात. जेव्हा भगवंतांची तपश्‍चर्या पुर्ण झाली त्यावेळी देवीची ही सेवा पाहून ते अत्याधिक प्रसन्न झाले अन् देवीला त्यांनी वर दिला की या स्थळाला आमच्या नावाच्या आधि तुझे नाव लागेल. आणि तेथून या तीर्थक्षेत्राचे ‘बद्रीनाथ’ असे नाम प्रचलित झाले.

भगवान नारायणाने स्वतः येथे तपश्‍चर्या केलेली ही पवित्र भुमी पुजनासाठी आद्य जगत् गुरू शंकराचार्य यांनी २ हजार वर्षांपुर्वी येथे पुजनासाठी रावल यांची नेमणूक केली. जे आजही येथे पुजा करतात. आद्य जगत् गुरू शंकराचार्यांनी २ हजार वर्षांपुर्वी सुरु केलेली ही परंपरा आजतागायत कायम आहे. शास्त्र परंपरेनुसार येथे सहा महिने देवाचे कपाट बंद केले जाते. या काळात भगवान बद्रीनाथाची पुजा देवर्षी नारद करतात, तर जेव्हा मंदिराचे कपाट उघडे असते तेव्हा मनुष्य येथे पुजा करतात.

कठोर तपश्‍चर्येतून बद्रीनाथाची पुजा

बद्रीनाथ धाम येथे भगवंताची पुजा करणारे रावल हे मुळचे केरळचे. भगवंताचे पुजन करताना त्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागते. जसे की येथे तापमानाचा पारा उणे १५ अंशापर्यंत खाली जातो. तरिही त्यांना दिवसातून किमान चार वेळा अंघोळ करावीच लागते.

मंदिराचे द्वार जेव्हा उघडे असतात तेव्हा एकही दिवस खाडा न पडू देता देवतेची पुजा करावी लागते. एक दिवस खाडा पडला तरी त्यांचे पुजारी पदाचे अधिकार कायमचे समाप्त होतात. ईश्वर प्रसाद नंबूदरी हे सध्या बद्रीनाथ धाम येथे रावल म्हणून पुजा करत आहेत.

देवीच्या पुजनवेळी रावल धारण करतात स्त्री वेष

बद्रीनाथ धाम येथे पुराणातील उल्लेखानुसार देवी लक्ष्मीची देखील पुजा केली जाते. यासह ज्यावेळी भगवान नारायण मंदिराचे द्वार बंद होतात तेव्हा देवी लक्ष्मीची मुर्तीदेखील मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाते. बद्रीनाथ धामचे द्वार उघडल्यानंतर देवीची मुर्ती पुन्हा पुर्ववत स्थळी म्हणजे बद्रीनाथ मंदिराच्या प्रांगणात असलेल्या देवीच्या मंदिरात स्थापन केली जाते. यावेळी पुजा करणाऱ्या रावल यांना स्त्रीवेष धारण करावा लागतो अशी माहिती स्वामी संविदानंद यांनी दिली.

हिमालयात तापमानाचा पारा खाली आल्यानंतर मंदिरांचे द्वार भक्तांना दर्शनासाठी बंद केले जाते. यावेळी देवाची मंत्रोच्चाराच्या घोषात विधीवत पुजा केली जाते. यावेळी देवाला कुठलाही धातूयुक्त जसे की सोने, चांदीचा शृंगार न करतान वनमाळी म्हणजे फुलांचा शृंगार केला जातो. यासह मानागाव येथील कुमारीकांच्या हातून तयार झालेल्या कंबलाने घृतकंबल पुजा केली जाते.
यावेळी आर्मी बँडचा ध्वनी नाद केला जातो. यावेळी भारतीय लष्कराचे अधिकारी, जवान, मंदिराचे विश्‍वस्त तथा मोठ्या संख्येने भाविक- भक्त उपस्थित होते.

देवाच्या मंदिराचे कपाट बंद होऊन आता सहा महिने दर्शन होणार नाही याची खंत वाटते मात्र हेच सहा महिने उलटल्यानंतर मात्र देवाचे भक्तीभावाने दर्शन घेता येईल याचा निश्‍चीत आनंदही आहे असे स्वामी संविदानंद म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT