Raisina-Dialogue 
देश

दिल्लीत होणाऱ्या 'रायसिना डायलॉग'मधून बांगलादेश बाहेर; CAA चा परिणाम!

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधणाऱ्या 'रायसिना डायलॉग 2020' या परिसंवादात बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार नसल्याचे कळते. याआधी नागरिकत्व विधेयकावरून तेथील परराष्ट्रमंत्र्यांनी भारत दौरा रद्द करून आपली नाराजी व्यक्त केली होती. 

परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे 'रायसिना डायलॉग 2020' हा कार्यक्रम 14 ते 16 जानेवारीदरम्यान दिल्लीत होणार आहे.

यात जगभरातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यात अमेरिका, रशिया, इराण, मोरोक्को, मालदीव, भूतान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, उझबेकिस्तान या देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे.

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री शहरीयार आलम हेदेखील यात सहभागी होणार होते. मात्र, आता परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान शेख हसिना यांच्या समवेत ते अबुधाबी दौऱ्यावर जाणार असल्याने या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. 

दुसऱ्यांदा दौरा रद्द 

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक छळामुळे भारतात आश्रय घेतलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्‍चन अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणारे सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानंतर बांगलादेशने नाराजी व्यक्त करताना परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा आयत्या वेळी रद्द केला होता. आता 'रायसिना डायलॉग'मध्ये सहभाग टाळून बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दुसऱ्यांदा भारत दौरा रद्द केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra ST concession: प्रवासी कार्डद्वारेच ऑक्टाेबरपासून सवलत ; एसटीकडून क्यूआर कोड पावती महिनाभर ग्राह्य धरणार

दुबईत सोन्याचं एटीएम लावणारा अशर्फी सेठ कोण होता? दाऊदला ‘डॉन’ बनवण्यात होती मोठी भूमिका

ममता कुलकर्णीचा पुन्हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? ९०च्या गाण्यांवर धरला ठेका, Viral Video

Google's Birthday: गुगलचा २८वा बर्थडे! होमपेजवर दिसलं खास Doodle; काय आहे यामागची गोष्ट?

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अचूक माहिती महत्त्वाची : नितेश राणे

SCROLL FOR NEXT