Yogaguru Baba Ramdev Acharya Balkrishna esakal
देश

Baba Ramdev : फसवणूक प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना समन्स; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

न्यायालयानं बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

न्यायालयानं बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बेगुसराय : बिहारमध्ये योगगुरू बाबा रामदेव (Yogaguru Baba Ramdev) आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी समन्स जारी करण्यात आलं आहे.

बेगुसराय जिल्हा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांनी निंगा गावातील रहिवासी तक्रारदार महेंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रार पत्रावर सुनावणी करताना योगगुरू बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना कलम 420 आणि 417 अंतर्गत समन्स बजावण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयानं बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर, 18 जून 2022 रोजी बरौनी पोलीस स्टेशन (Barauni Police Station) परिसरातील निंगा गावामधील रहिवासी महेंद्र शर्मा यांनी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरोधात सीजीएम कोर्टात (CGM Court) तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पैसे घेऊनही उपचार केले जात नसल्याचा आरोप तक्रारदारानं केला होता.

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

फिर्यादी महेंद्र शर्मा यांनी योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्यावर आरोप केलाय की, आम्ही उपचारासाठी पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड (Patanjali Ayurveda Private Limited) महर्षी कॉटेज योग ग्राम झुलामध्ये एकूण 90,000 रुपये जमा केले होते. माझा मुलगा नरेंद्र कुमार याच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले होते. पैसे जमा केल्यानंतर मी, माझा मुलगा आणि पत्नी पतंजलीनं दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेत उपचार करण्यासाठी तिथं गेलो. परंतु, तिथं आम्हाला तुमचे पैसे जमा झाले नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानंतर न्यायालयानं योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्या विरोधात पुराव्याची दखल घेत दोन्ही आरोपींना 12 जानेवारी 2023 पर्यंत न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT