Congress leader Satish Jarkiholi esakal
देश

Satish Jarkiholi : मोदी सरकारनं आमचं सर्व्हर EVM सारखं हॅक केलंय; मंत्री जारकीहोळींचा भाजपवर गंभीर आरोप

केंद्र सरकारनं आमचं सर्व्हर व सिस्टम इव्हीएमसारखं हॅक केलंय. त्यामुळं गॅरन्टी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अर्ज करण्यास अडचणी येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

माझ्या विधानाचा भाजप नेते वेगळाच अर्थ काढत असून हे योग्य नाही.

बेळगाव : हमी योजनांच्या अंमलबजावणीवरून कर्नाटकात काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला नवं वळण मिळालंय. कारण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्र सरकारवर गृह ज्योती नोंदणी पोर्टल हॅक केल्याचा आरोप केलाय.

केंद्र सरकारनं आमचं सर्व्हर व सिस्टम इव्हीएमसारखं हॅक केलंय. त्यामुळं गॅरन्टी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अर्ज करण्यास अडचणी येत आहेत, हे माझं विधान केवळ राजकीय आहे.

यातून कोणाला वैयक्तिक दोष देण्याचा उद्देश नव्हता, असं पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी म्हटलंय. माझ्या विधानाचा भाजप नेते वेगळाच अर्थ काढत असून हे योग्य नाही.

भाजप नेत्यांनीही अनेकदा भलतीच विधाने करून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा विधानांची मोठी यादीच तयार होऊ शकते, असंही जारकीहोळी म्हणाले. काँग्रेसनं योग्य नियोजन न करता हमी योजना जाहीर केल्याच्या केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या आरोपाला जारकीहोळींनी प्रत्युत्तर दिलंय.

जारकीहोळी म्हणाले, आम्ही नियोजन केलं होतं. परंतु, आमचं मशीन केंद्रानं हॅक केलं. जसे ते ईव्हीएम हॅक करतात, तसेच त्यांनी हे हॅक केलं आहे. त्यामुळे विलंब झाला आहे. आम्ही काय करू शकतो?, असाही त्यांनी सवाल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT