Bengal Tiger Esakal
देश

Bengal Tiger : राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघालाच का मिळाला मान? जाणून घ्या Interesting कहाणी!

वाघाच्या आधी सिंह होता आपला राष्ट्रीय प्राणी!

सकाळ डिजिटल टीम

जंगलाचा राजा सिंह आणि मग आपला राष्ट्रीय प्राणी वाघ का? वाघ खरतर मांजर कुळातला प्राणी मग एक मोठं मांजर आपला राष्ट्रीय प्राणी कसा बनला. बरं शरीराच्या बलाढ्यतेकडे पहायचं तर हत्ती आणि उंचीकडे पहायचं तर जिराफ आपला राष्ट्रीय प्राणी असायला हवा होता. मग असा हा प्राणी आपला राष्ट्रीय प्राणी म्हणून का निवडला गेला हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर, याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात

वाघाच्या आधी सिंहच होता राष्ट्रीय प्राणी

सिंह ही भारताची खास ओळख होती. विशेषतः अशोकाच्या काळात सिंहाकडे ऐतिहासिक प्रतीक म्हणून पाहिले गेले आहे. एक काळ असा होता जेव्हा ते मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली, हरियाणा आणि गुजरातमध्ये होते. मग हळूहळू विविध कारणांमुळे त्यांचा अधिवास कमी होत गेला. आज सिंह फक्त गुजरातच्या गिरवानमध्येच आढळतात.

भारतीय वाघ किंवा रॉयल बेंगाल टायगरला जगात महत्त्वाचे स्थान आहे. आज देशातील 16 राज्यांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे, जे संपत असल्याचे दिसत होते. आज पुन्हा एकदा मध्य प्रदेश वाघांचे राज्य बनले आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने 1972 मध्ये वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले होते. प्रोजेक्ट टायगर 1972 मध्येच सुरू करण्यात आला होता.

मोठ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. मांजरींच्या 36 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यापैकी सर्वात मोठी मांजर वाघ आहे. भारतात, बंगाल टायगर हे सिंहापेक्षा मोठे आहेत आणि त्यांच्या विशेष गुणांमुळे त्यांना जंगलाचा राजा म्हटले जाते.

भारतीय वाघ किंवा रॉयल बंगाल टायगरला जगात महत्त्वाचे स्थान आहे. आज देशातील 16 राज्यांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे, जे संपत असल्याचे दिसत होते. आज पुन्हा एकदा मध्य प्रदेश वाघांचे राज्य बनले आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने 1972 मध्ये वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले होते.

Prime Minister Indira Gandhi with Tiger

वाघासाठी घेण्यात आली ऐतिहासिक बैठक

1969 च्या हिवाळ्यात भारताची राजधानी नवी दिल्ली येथे ऐतिहासिक बैठक झाली. बंगालच्या वाघाचे भविष्य ठरवण्यासाठी आययूसीएनच्या  दहाव्या महासभेत जगभरातील तज्ञ उपस्थित होते. शिकारी आणि व्यावसायिक सफारी ऑपरेटर्सच्या संयुक्त गटाने विरोध दर्शविला असताना ही, हा निर्णय वाघांच्या बाजूने लागला.

वाघ लुप्त होण्याच्या मार्गावर असलेला धोकादायक जीव म्हणून घोषित करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निर्णयाने प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली. वाघांच्या बचावासाठी प्रोजेक्ट टायगर 1972 मध्येच सुरू करण्यात आला होता.  मोठ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. जगभरात मांजरींच्या 36 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यापैकी सर्वात मोठी मांजर म्हणून वाघ ओळखला जातो.

भारतात, बंगाल टायगर हे सिंहापेक्षा मोठे आहेत आणि त्यांच्या विशेष गुणांमुळे त्यांना जंगलाचा राजा म्हटले जाते.बंगाल टायगर जंगलातील त्यांच्या डरकाळ्यांसाठी ओळखले जातात. तज्ञांनी मोठ्या मांजरींमध्ये चार प्राणी समाविष्ट केले आहेत जे गर्जना करू शकतात. यामध्ये सिंह, वाघ, जग्वार आणि बिबट्या यांचा समावेश आहे.

बंगालच्या वाघांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या घशातून निघणारा आवाज कोणाचेही भयभीत करण्यात पुरेसा आहे. त्यांच्या गर्जना जंगलात घुमतात तेव्हा सगळा परिसर खडबडून जागा होतो. वाइल्ड लाइफच्या जगात याला कॉलिंग म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT