Karnataka Election Result
Karnataka Election Result 
देश

Karnataka Election Result : काँग्रेसच्या विजयात 'भारत जोडो' यात्रा ठरली 'गेमचेंजर'; तब्बल 'एवढ्या' जागा आणल्या खेचून

Sandip Kapde

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. काँग्रेसने कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे भाजप आणि जेडीएसची पिछेहाट झाली आहे. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकमध्ये मोठा प्रभाव दिसला आहे.

राहुल गांधी यांनी भाजप विरोधात भारत जोडो यात्रा काढली होती. भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी, या वादात राहुल गांधींची पदयात्रा विजयी ठरली. काँग्रेस नेत्यांनी हे स्पष्ट केले आहे.

कर्नाटकातील २० विधानसभा मतदारसंघांपैकी ज्या मतदार संघातून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली. त्यापैकी १५ मतदारसंघ काँग्रेसने जिंकले. जेडीएसने ३ तर भारतीय जनता पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत या २० जागांपैकी काँग्रेसला फक्त ५ जागा मिळाल्या होत्या.

भारत जोडो यात्रा कर्नाटकातील काँग्रेससाठी 'संजीवनी' ठरली आहे. या यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला होता. ज्यामुळे निवडणूक विजयात मदत झाली, असे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे.

भारत जोडो यात्रा कर्नाटकातील २० विधानसभा मतदारसंघातून गेली. त्यापैकी काँग्रेसने १५ जागा जिंकल्या आहेत.  बेल्लारी जिल्ह्यातील बेल्लारी आणि बेल्लारी शहर विधानसभा जागा, चामराजनगर जिल्ह्यातील गुंडुलपेट विधानसभा जागा, चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर आणि मोलकलामुरू विधानसभा जागा आणि मंड्या जिल्ह्यातील मेलुकोटे (सहकारी), नागमंडगला आणि श्रीरंगपटना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

यासह काँग्रेसने म्हैसूर जिल्ह्यातील नांजनगौड आणि वरुणा, रायचूर जिल्ह्यातील रायचूर ग्रामीण विधानसभा जागा, तुमकुरू जिल्ह्यातील गुब्बी आणि सीरा विधानसभा जागा जिंकल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT