पंकजा मुंडे
पंकजा मुंडे 
देश

पंकजा मुंडे दिल्लीत दाखल; तर्कवितर्कांना उधाण

नामदेव कुंभार

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. या सर्व घटना घडत असतानाच पंकजा मुंडे या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत पंकजा मुंडे यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मंगळवारी पंकजा मुंडे मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. याबैठकीत मोठा निर्णय होऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपमधील मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर (ता. १० जुलै) बीडमधील १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. विस्ताराच्या दिवशीही मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. सुत्रांच्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पहावं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ७ जुलै रोजी झाला. त्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. सुरुवातीला आघाडीवर असलेले मुंडे यांचे नाव विस्ताराच्या दिवशी मागे पडले आणि प्रीतम यांची केंद्रीय मंत्री होण्याची संधी हुकली. मुंडे यांच्याऐवजी खासदार भागवत कराड यांना संधी देण्यात आली. त्यामुळे समर्थकांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT