Amit Shah Narendra Modi Sakal
देश

Gujarat Election: भाजपमध्ये मोठं बंड! पक्षाने 7 बंडखोर आमदारांचं केलं निलंबन; आता...

सकाळ डिजिटल टीम

गांधीनगर : भाजप पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सात नेत्यांना भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित केले आहे."या आमदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या हवाल्याने स्पष्ट झाले आहे. (Gujarat Election news in Marathi)

निलंबित करण्यात आलेल्या भाजप नेत्यांमध्ये नर्मदा जिल्ह्यातील नंदगड येथील हर्षद वसावा यांचा समावेश आहे. जुनागढमधील केशोद जुनागड येथून तिकीट मागणाऱ्या अरविंद लाडानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सुरेंद्रनगरमधील धनगड्रा येथील चत्रसिंह गुंजरिया, वलसाडमधील पराडी येथील केतन भाई पटेल, राजकोट ग्रामीणमधील भरत भाई चावडा, गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथील उदय भाई शहा आणि अमरेलीच्या राजुलातून तिकीट मागणाऱ्या करण भाई बरैया यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये भाजपने ४२ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. १६० उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा करणाऱ्या भाजपने ३८ विद्यमान आमदारांना तिकीट दिले नाही. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या अनेक दिग्गज नेत्यांना भाजपने डच्चू दिल आहे.

2017 च्या गुजरात निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. मागील २७ वर्षांपासून भाजपची गुजरातमध्ये सत्ता आहे. पंतप्रधानपदी निवड होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

लक्ष्मीच्या पाऊलांनी फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज,"चार वर्षांचं नातं..."

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर येथे सुरक्षारक्षकांकडून भाविकांना धक्काबुक्की; दर्शनासाठी भाविकांची ससेहोलपट

Success Story: साेलापूर पूर्व भागातील ६ विद्यार्थ्यांचे सीएच्या परीक्षेत यश; चार्टर्ड अकाउंटंट नवी ओळख

'मला लग्न करायचं पण...' लग्नाबद्दल स्पष्टचं बोलली तेजस्विनी पंडित, म्हणाली...'माझ्या जोडीदाराने...'

SCROLL FOR NEXT