नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिल्लीतील बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रमात गौतम सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हजर असलेल्या नागरिकांना हिंदू देवतांना न मानण्याची शपथ दिल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर हे देखील उपस्थित होते. (BJP targets AAP accusing it of making anti Hindu statements)
बौद्ध भिक्खू काही लोकांना हिंदू धर्मातून बौद्ध धम्मात प्रवेश देत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमाला राजेंद्रपाल गौतमही उपस्थित होते. या व्हिडिओमध्ये धर्मांतरावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं वाचन या कार्यक्रमा उपस्थित प्रत्येकानं केलं. यामध्ये ‘मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. राम-कृष्णाची पूजा करणार नाही. कोणत्याही हिंदू देवतेवर विश्वास ठेवणार नाही,’ असं म्हणताना दिसत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
या प्रकरणाबाबत भाजपनं संसद मार्गावरील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आम आदमी पार्टीवर चौफेर हल्ला केला आहे. ‘केजरीवाल यांचे मंत्री हिंदूंचा, हिंदू देवदेवतांचा अवमान करत आहेत. केजरीवाल गुजरातमध्ये जय श्रीकृष्ण म्हणण्याचे नाटक करत आहेत. आम आदमी पार्टी ही गरीब हिंदूंना मोफत वस्तू देऊन धर्मांतर करणारी संस्था बनली आहे,’ अशा शब्दांत भाजप नेते कपिल मिश्रा यांनी टीका केली आहे.
दरम्यान, खासदार मनोज तिवारी यांनीही राजेंद्रपाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राजेंद्रपाल गौतम यांनी मात्र समर्थन करताना, ‘भाजप देशद्रोही आहे. माझा बौद्ध धर्मावर विश्वास आहे. राज्यघटनेने आम्हाला कोणताही धर्म पाळण्याचा अधिकार दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.