fisher man arrested news esakal
देश

Bordi : पाकिस्तानी सैनिकांकडून १६ मासेमारी खलाशांना अटक

खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी अटक करून तुरुंगात ठेवले डांबून

अच्युत पाटील

बोर्डी : गुजरातमध्ये खोल समुद्रात मासेमारी करता गेलेल्या 16 खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी सहा खलाशी कामगार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या बोर्डी पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या अस्वाली गावातील आहेत.त्यातील एक खलाशी आशागड येथील असल्याची खात्री पटली आहे. गुजरात मधील ओखा बंदरातून मत्स्यगंधा आणि अन्य एक नौका मासेमारीसाठी गेलेली असताना पाकिस्तानी सैनिकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तान इंडिया पीपल्स फार्म फॉर पीस अँड डेमोक्रसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी ही माहिती दिली .संबंधित खलाशांची सुटका व्हावी म्हणून अस्वली येथील आदिवासी समाज कार्यकर्ते गणपत बुजड यांनी जिल्हाधिकारी पालघर व तहसीलदार डहाणू यांच्याकडे विनंती अर्ज दाखल केला आहे.

खलाशांची नाव खालील प्रमाणे

1)नवशा भीमरा

2)सरीत उंबरसाडा

3) विजय नगवासी

4)विनोद कोल

5) कृष्णा बुजड

6) जयराम उर्फ उधऱ्या सालकर

खलाशी कामगार बोर्डी पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या अस्वली गावचे आहेत .तर उमजी पाडवी हा आशागड येथील रहिवासी आहे. यापैकी पाच जण विवाहित असून कृष्णा बुजड हा 19 वर्षाचा तरुण अविवाहित आहे.

2021 मध्ये बोर्डी येथील खलाशी कामगार अजय गारडी गुजरात राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेला असताना पाकिस्तानी सैनिकांनी अटक करून तुरुंगात डांबून ठेवले आहे .त्याची अद्यापही सुटका न झाल्यामुळे अटक झालेल्या खलाशी कामगारांच्या नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL ची कॉपी करायला गेले अन् पाकडे तोंडावर आपटले; कवडी भावात विकली गेली PSL मधील हैदराबाद फ्रँचायझी, रिषभ-श्रेयस मिळून एवढे कमावतात...

BJP: भाजप नेत्याचा रहस्यमयी मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, कुटुंबाने दिली धक्कादायक माहिती

Fact Check : एलिसे पेरीने लाईव्ह सामन्यात बाबर आझमला केलं प्रपोज? BBL सामन्यात नेमकं काय घडलं?

'चला काहीतरी चांगलं पहायला मिळणार...' समरचा भूतकाळ स्वानंदीला कळणार! आजीला विश्वासात घेऊन स्वानंदी घरातल्यांचं सत्य समोर आणणार

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT