viral video boy take bath  
देश

तरूणाने आंघोळीसाठी केला अजब जुगाड! एकदा व्हिडिओ पाहाच

आपल्याला एखादी गोष्ट हवी असली की ती गोष्टी काहीही करून मिळवली जातेच.

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला एखादी गोष्ट हवी असली की ती गोष्टी काहीही करून मिळवली जातेच. त्यासाठी लोकं विविध प्रयत्न करतात. काहीजण तर चक्क जुगाड करतात. असे जुगाड करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नक्कीच वाखाणण्यासारखे असतात. सोशल मीडियावर (Social Media) असे जुगाड करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाले आहेत. असाच एक जुगाड करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात चक्क तरूणाने शॉवर खाली आंघोळ करण्यासाठी जे तंत्र वापरले आहे ते बघून लोकांनी त्याचे कौतुक केले आहे.

ट्विटरवर पारीख जैन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका मुलाचा आहे. या मुलाला शॉवरखाली आंघोळ करायची होती. पण त्याच्याकडे शॉवर नव्हता. त्यांनी डोकं चालवलं आणि जुगाड करत शॉवर तयार केला. या व्हिडिओत बघायला मिळतं की हा मुलगा उघड्यावर आंघोळीला बसला आहे. तो अंगाला साबण लावतो आहे. नीट बघितलं तर लक्षात येईल की त्याच्या डोक्याच्या थोडं वर काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीत पाणी भरलेलं आहे. अंगाला साबण लावल्यावर तो मुलगा सिंकजवळ असलेला झाडू घेऊन त्यातल्या काठीने पिशवीला खूप भोकं पाडतो. त्यानंतर त्याच्या अंगावर शॉवरसारखे पाणी पडायला सुरूवात होते. त्यानंतर मुलगा आनंद घेत आंघोळ करतो.

लोकांना मुलांनी लढवलेली कल्पना आवडली आहे. त्यांनी या व्हिडिओवर खूप कमेटंस केल्या असून त्याचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलंय मानलं तुला. तर दुसरा म्हणाला कचऱ्यासाठी लागणाऱ्या काळ्या पिशवीचा असा उपयोग होईल वाटलं नव्हतं. अशा अनेक कमेंट्स करून त्याने मुलाचं कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT